शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिरात प्रदक्षिणा घालतानाच आला हृदयविकाराचा झटका, कोल्हापुरातील वारकऱ्याचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:09 IST

गेल्या अनेक वर्षांपासून ते माघ वारीला पंढरपूरला पायी जात होते

कसबा तारळे तुरंबे : चक्रेश्वरवाडी (ता. राधानगरी) येथील सदाशिव महादेव बारड (वय ५५) यांचे पंढरपुरात एकादशीदिवशी मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सदाशिव बारड हे विठ्ठल भक्त होते.गेल्या अनेक वर्षांपासून ते माघ वारीला पंढरपूरला पायी जात होते. यावर्षी ते शनिवार (दि. २८) जानेवारीला पंढरपूरला गेले होते. पंढरपुरात गेल्यापासून नित्यनेमाने दर्शन, पूजा व प्रदक्षिणा हा त्यांचा नित्यक्रम ठरला होता.बुधवारी सकाळी एकादशीदिवशी सदाशिव बारड यांना मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तात्काळ पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा चक्रेश्वरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSolapurसोलापूरvarkariवारकरीHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू