नोटबंदीनंतर निवडणुकांसाठी भाजपाकडे पैसा आला कुठून? - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:38 IST2019-04-16T20:36:28+5:302019-04-16T20:38:40+5:30

नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा काय झाला? देशातला पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला. 

Where did the money came from the BJP in elections? Raj Thackeray questions on BJP | नोटबंदीनंतर निवडणुकांसाठी भाजपाकडे पैसा आला कुठून? - राज ठाकरे 

नोटबंदीनंतर निवडणुकांसाठी भाजपाकडे पैसा आला कुठून? - राज ठाकरे 

इचलकरंजी - नोटबंदी करताना आरबीआयला माहित नाही. मंत्रिमंडळाला माहीत नाही. मंत्र्यांचे मोबाईल काढून घेतले. सर्वोनुमते निर्णय का घेतला गेला नाही? 14 लाख कोटी रुपये देशाच्या व्यवहारात चलनात होते. 500-800 कोटींच्या खोट्या नोटा असताना 14 लाख कोटी नोटाबंदी केली गेली. 2014 पासून आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाकडे पैसा आला कुठून? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला केला आहे. सोलापूरनंतर राज ठाकरे यांनी इचलकरंजीमध्ये सभा घेतली त्यामध्ये ते बोलत होते. 

यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले की, काळा पैसा आणायचा आहे तर तुमच्या ईडी, आयकर विभाग यापासून सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असताना काळा पैसा कुणाकडे आहे याची माहिती सरकारला नाही का? नोटबंदीचा उद्देश स्वच्छ नव्हता. नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांचे रोजगार गेले, यंत्रमाग कामगार उधवस्त झाले. नोकऱ्या कुठे शोधायच्या? नोटबंदी, जीएसटी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. जाहिरातींवर साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले गेले. नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा काय झाला? देशातला पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला. 

माझा उमेदवार निवडणुकीत उभे नसले तरी भाजपावाले फडफडतायेत, आम्ही सभा घेतोय तर खर्च आमच्यात खात्यात मोजणार असं सांगत मी जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाही असा आरोप करत राज यांनी मी जे करतोय ते देशाच्या भविष्यासाठी चांगलंच आहे. कारण यापुढे देशातला कोणताही राजकारणी तुमच्यासमोर उभं राहिला तेव्हा तो खोटा बोलणार नाही, खोटं बोलून मतं मागणार नाही असा दावा राज ठाकरेंनी जनतेसमोर केला. 

मेक इन इंडिया महाराष्टाला शिकवू नये
इचलकरंजी येथे 1904 साली यंत्रमाग सुरु झालं. महात्मा गांधी यांनी सुत काढण्याआधीच इचलकरंजी शहराने सुत काढायला सुरुवात केली होती हा या शहराचा इतिहास आहे. नॅनो गाडी रतन टाटा यांनी काढली मात्र त्याआधी 1970 साली इचलकरंजीतल्या माणसाने मिरा नावाची सर्वात छोटी गाडी काढली. इथे हरहुन्नरी लोकं असताना त्यांना मेक इन इंडिया शिकवता? महाराष्ट्र नेहमीच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवले. आजही देशात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच आहे. त्यामुळे मेक इन इंडिया महाराष्ट्राला शिकवू नये असा टोला राज यांनी लगावला. 
 

Web Title: Where did the money came from the BJP in elections? Raj Thackeray questions on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.