इचलकरंजी : कोल्हापूरला थेट पाईपलाईन आल्याशिवाय मी आमदारकी लढणार नाही, असा निर्णय मी घेतला होता, तशी गर्जना ते करू शकतात का?, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले. तसेच मूळ भाजपवाले कोठे आहेत? ज्यांनी काँग्रेसविरोधात संघर्ष केला, ते आता कोठे आहेत, ते शोधा, असा टोलाही लगावला.शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्वामी अपार्टमेंट व शहापूर चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, इचलकरंजीची ओळख मॅँचेस्टर म्हणून आहे. ती ओळख पुसण्याचे काम सत्तेतील लोक करीत आहेत. आठ-आठ दिवस पाणी येत नाही. आमदार होऊन एक वर्ष उलटले तरी पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही? इतके दिवस पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही? तुम्हाला झाडाला बांधून ठेवले होते का? जर तुम्ही पाणीप्रश्न सोडवला असता, तर आम्हाला पॅनलला उभा करायला माणसेसुद्धा मिळाली नसती.
वाचा: नेहरू-गांधींची काँग्रेस संपली; आता घर भरणारी काँग्रेस शिल्लक, शिवेंद्रराजे भोसले यांचा हल्लाबोल शशांक बावचकर म्हणाले, मूलभूत प्रश्न हाताळण्याचे कामसुद्धा या नेत्यांनी केले नाही. आमदार बोले, आयुक्त डोले असे काम सुरू आहे. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, संजय कांबळे, उदयसिंह पाटील, सयाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
वाचा: पक्षांचे पाच तर १३ अपक्ष रिंगणात; ९ माजी नगरसेवक, ३ माजी सभापती आकड्याची चिठ्ठीआमदार पाटील यांनी विरोधी पक्षातील उमेदवाराचा समाचार घेताना म्हणाले, ‘विरोधकांच्याबद्दल मी बोलत नाही, पॉम्पलेट वाटताना त्यांच्या खिशातून आकड्याची चिठ्ठी निघाली नाही म्हणजे मिळवलं.’
Web Summary : Satej Patil challenged BJP to address Ichalkaranji's water scarcity, questioning their past struggles for Congress opposition. He highlighted the city's declining industrial status and criticized the lack of progress on vital infrastructure during a Shiv-Shahu Vikas Aghadi rally.
Web Summary : सतेज पाटिल ने बीजेपी को इचलकरंजी की पानी की कमी को दूर करने की चुनौती दी, कांग्रेस के विरोध के लिए उनके पिछले संघर्षों पर सवाल उठाया। उन्होंने शहर की घटती औद्योगिक स्थिति पर प्रकाश डाला और शिव-शाहू विकास अघाड़ी रैली के दौरान महत्वपूर्ण बुनियादी ढांचे पर प्रगति की कमी की आलोचना की।