कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
By संतोष कनमुसे | Updated: August 6, 2025 19:23 IST2025-08-06T19:20:21+5:302025-08-06T19:23:32+5:30
Kolhapur Mahadevi Elephant : महादेवी हत्ती लवकरच कोल्हापुरला परत येणार आहे, याबाबत आज वनताराच्या सीईओ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
Kolhapur Mahadevi Elephant : मागील काही दिवसांपासून महादेवी हत्ती परत मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज वनताराचे सीईओ विवान करानी यांनी नांदणी येथील मठाचे महास्वामी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. माधुरी हत्ती परत आणण्यासाठी नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
"आम्ही सगळी म्हणजे नांदणीचा मठ, वनतारा आणि राज्य सरकार सर्वजण मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. आम्ही हत्तीची या ठिकाणी चांगली व्यवस्था करणार आहे. हत्तीणीचे आम्ही लवकरच पुनर्वसन करणार आहे. आम्ही सर्वजण मिळून या गोष्टी सकारात्मक करणार आहे. अनंत अंबांनी यांगी सांगितले आहे की, आम्हाला कधीच कोल्हापूर वासियांना दु:ख द्यायचे नव्हते. त्यांना माधुरीची काळजी वनतारामध्ये घ्यायची होती. यामध्ये इगो अडवा येत नाही, यामध्ये कोणाची हार किंवा विजय नाही. यामध्ये हत्तीचा विजयच आहे. कारण हत्तीला वनतारामध्येही चांगले घर मिळत होते आणि मठामध्येही चांगले घर मिळत होते. तुमची माधुरी लवकरच कोल्हापुरात येईल, अशी माहितील वनताराचे सीईओ विवान करानी यांनी दिली.
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
आम्ही या याचिकेमध्ये वनतारामध्ये हत्तीसाठी जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था या मठामध्ये करणार असल्याची माहिती देणार आहे. आम्ही ही याचिका पेटा आणि एचपीसी यांच्या पाठिंब्याने ही याचिका दाखल करणार आहे. आम्ही कधीही कोल्हापुरवासियांना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आला त्यावर आम्ही काम करत होतो.सगळ्यांनी समजून घेतल्याबद्दल आभारी आहे, असंही वनताराचे सीईओ विवान करानी म्हणाले.
"वनताराचे सीईओ विवान करानी यांच्यासोबत बैठक झाली. नांदणी मठ, वनतारा, महाराष्ट्र सरकार यांच्यामार्फत याचिका दाखल केली जाणार आहे. मठाजवळ केंद्र उभा करण्यात येणार आहे. हत्तीची मालकी हक्क मठाकडे राहणार आहे. हत्तीच्या देखभाल, वैद्यकीय व्यवस्था वनतारा पुरवणार आहे. त्याचबरोबर समाधानकारक चर्चा झाली आहे.माधुरी हत्ती परत येईपर्यंत वनताराने आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती आहे. अनंत अबांनी यांच्या परिवाराने वनताराच्या पथकाला इथे पाठवले आहे. अंबांनी यांच्या या भूमिकेला आमचा आशीर्वाद आहे, असंही महास्वामी यांनी सांगितले.