शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सव्वापाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, पाठलाग करून तिघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:51 IST

सिंधुदुर्गमधून आणली विक्रीसाठी

कोल्हापूर : सुमारे सव्वापाच कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विकण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डमी ग्राहक पाठवत पाठलाग करून अटक केली. पुणे-बंगळुरू महामार्गावर कणेरीवाडी येथे शुक्रवारी (दि. २६) रात्री केलेल्या कारवाईत माशाची सव्वापाच किलो उलटी, कार आणि मोपेड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सिंधुदुर्गमधील एका व्यक्तीकडून माशाची उलटी विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली.संभाजी श्रीपती पाटील (वय ७८, रा. चंद्रे, ता. राधानगरी), अनिल तुकाराम महाडिक (५५, रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) आणि कर्नाटकातील प्रमोद उर्फ पिटू शिवाजी देसाई (४८, रा. चिक्कलवहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार परशुराम गुजरे यांना काही व्यक्ती पुणे-बंगळुरू महामार्गावर कणेरीवाडी येथे व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक संतोष गळवे आणि जालिंदर जाधव यांच्या पथकाने कणेरीवाडीजवळ डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच विक्रीसाठी आलेले तिघे पळून निघाले होते. पोलिसांनी पाठलाग करून खानविलकर नगर येथे त्यांना पकडले.संभाजी पाटील याच्याकडील सॅकमध्ये माशाची उलटी आढळली. पाटील याच्यासह देसाई आणि महाडिक यांच्यावर पोलिसांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलिसांकडून सुरू आहे. अंमलदार संतोष बरगे, सागर चौगले, योगेश गोसावी, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, वनअधिकारी जगन्नाथ नलवडे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Whale Vomit Worth ₹5.25 Crore Seized, Three Arrested

Web Summary : Police in Kolhapur seized ₹5.25 crore worth of whale vomit (ambergris) and arrested three smugglers attempting to sell it. The operation involved a decoy customer and a chase, leading to arrests near Kanneriwadi. The suspects confessed to sourcing the ambergris from Sindhudurg.