कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून पहिल्याच प्रयत्नात विजयी झालेला बयाजी देवू शेळके हा धनगर समाजातील अत्यंत सामान्य कार्यकर्ता ह्यजायंट किलरह्ण ठरला. दूध संस्थेचा सचिव ते संघाचा संचालक अशी विजयी झेप त्याने घेतली आहे. त्याने संघाचे मागील तीन टर्म संचालक असलेले विश्वास शंकर जाधव (रा. कोडोली) यांचा पराभव केला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी बयाजीला पॅनेलमध्ये संधी दिली. बयाजी शेळके याला १९३९ तर जाधव यांना १६६५ मते मिळाली. बयाजी २७४ मतांनी विजयी झाला.या गटातून विश्वास जाधव यांचे कायमच वर्चस्व राहिले. विश्वास जाधव हे मूळचे रामोशी समाजातील. कधीकाळी ट्रॅक्टरने मुरूम ओढायचे काम ते करायचे. पन्हाळा बावड्याचे तत्कालीन आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना सांगून जाधव यांना संघाच्या पॅनेलमध्ये संधी दिली. त्यामुळे संघाच्या राजकारणात ते नरके गटाचे मानले जातात. कोडोलीच्या स्थानिक राजकारणात मात्र ते माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे काम करीत होते. अशा मातब्बर संचालकाला पराभूत करण्याची किमया शेळके यांनी करून दाखविली आहे.
Gokul Milk Election : वेसरफच्या दूध संस्थेचा सचिव झाला संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 19:59 IST
Gokul Milk Elecation : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून पहिल्याच प्रयत्नात विजयी झालेला बयाजी देवू शेळके हा धनगर समाजातील अत्यंत सामान्य कार्यकर्ता ह्यजायंट किलरह्ण ठरला. दूध संस्थेचा सचिव ते संघाचा संचालक अशी विजयी झेप त्याने घेतली आहे. त्याने संघाचे मागील तीन टर्म संचालक असलेले विश्वास शंकर जाधव (रा. कोडोली) यांचा पराभव केला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी बयाजीला पॅनेलमध्ये संधी दिली. बयाजी शेळके याला १९३९ तर जाधव यांना १६६५ मते मिळाली. बयाजी २७४ मतांनी विजयी झाला.
Gokul Milk Election : वेसरफच्या दूध संस्थेचा सचिव झाला संचालक
ठळक मुद्दे पालकमंत्री पाटील यांच्या पाठबळामुळे यशबयाजी शेळके ठरला जायंट किलर