शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Kolhapur: गोव्याला फिरायला गेले अन् दारू घेऊन आले; पलूसमधील सख्ख्या चुलत भावांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:19 IST

यातील एकाचे वडील महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती

कोल्हापूर : गोव्यात मौजमजा करून परत येताना ५० हजारांची दारू घेऊन आलेल्या दोघा सख्ख्या चुलत भावांना पोलिसांनी सापळा लावून पकडले. नवीन वाशी नाका येथे केलेल्या कारवाईत शुभम शिवकुमार साळुंखे (वय २८) आणि आशितोष हिंदुराव साळुंखे (२७, दोघे रा. आंधळी रोड, पलूस, जि. सांगली) यांच्याकडून पोलिसांनीगोवा बनावटीची ५० हजारांची दारू जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार योगेश गोसावी यांना भोगावतीमार्गे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने शनिवारी (दि. ४) रात्री नवीन वाशी नाका येथे सापळा रचला.संशयास्पद कार अडवून तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या दारूचे १२ बॉक्स सापडले. ५० हजार रुपयांची दारू आणि सात लाखांची कार असा साडेसात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटकेतील शुभम साळुंखे आणि आशितोष साळुंखे यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.बार चालकांना विक्रीचे नियोजनकारमध्ये लपवून आणलेली दारू पलूस परिसरातील बीअरबार चालकांना विकण्याचे नियोजन साळुंखे बंधूंनी केले होते. पहिल्याच प्रयत्नात ते पोलिसांच्या हाती लागले. यातील एकाचे वडील महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Cousins arrested smuggling Goan liquor for bar sales in Palus.

Web Summary : Two cousins from Palus were arrested near Kolhapur for smuggling Goan liquor worth ₹50,000. They intended to sell it to local beer bars. Police seized the liquor and their car, valued at ₹7 lakh. One suspect's father is a senior revenue officer.