निपाणीत तालुकास्तरीय रुग्णालय उभारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:55+5:302021-01-20T04:24:55+5:30
निपाणीच्या आमदार व मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून आठ कोटी निधीतून उभारलेल्या माता व शिशु केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत ...

निपाणीत तालुकास्तरीय रुग्णालय उभारू
निपाणीच्या आमदार व मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून आठ कोटी निधीतून उभारलेल्या माता व शिशु केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प. पू. प्राणलिंग स्वामीजी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, महानतेश कवठगीमठ, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, मंत्री जोल्ले यांच्यामुळे माता - शिशु केंद्र निर्माण झाले आहे. या केंद्रात लागणारी साधन सामग्री यासाठी तत्काळ टेंडर मागवून पूर्तता करणार आहे. निपाणी तालुका पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथील गरज ओळखून ट्रामा केअर सेंटर मंजुरीसाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, निपाणी शहर पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचारासाठी रुग्णांना बेळगाव व कोल्हापूरला जावे लागते. त्यामुळे निपाणी ट्रामा केअर सेंटर होणे तत्काळ गरजेचे आहे. या मागणीला सुधाकर यांनी आश्वासन दिले.
प्रारंभी फीत कापून माता - शिशु केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी उपनराध्यक्ष नीता बागडे, डॉ. सीमा गुंजाळ उपस्थित होते.