शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

रखडलेल्या ड्रेनेजलाईनवरून जल अभियंताची खरडपट्टी, नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 10:44 AM

ड्रेनेजलाईनचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांची खरडपट्टी केली.

ठळक मुद्देरखडलेल्या ड्रेनेजलाईनवरून जल अभियंताची खरडपट्टी, नागरिक आक्रमकनूतन आमदार चंद्रकांत जाधव यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी

कोल्हापूर : ड्रेनेजलाईनचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांची खरडपट्टी केली.महापालिकेने खानविलकर पेट्रोलपंप, ध्रुव रेसिडेन्सीसमोर ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी खुदाई केली आहे. एक महिन्यात पूर्ण होणारे काम सहा महिने झाले तरी अपूर्णच आहे. परिणामी नागरिकांसह विके्रत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील ढिगाऱ्यावर दीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी करत महापालिकेचा निषेध केला होता. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली. आमदार जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला.

यावेळी अधिकाऱ्यांनी रविवारी पाहणी करू, अशी ग्वाही दिली होती. यानुसार आमदार जाधव यांनी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, राहुल चव्हाण, संभाजी जाधव, दिलीप देसाई, उत्तम फराकटे, आप्पासाहेब होडगे, डॉ. बुद्धीराज पाटील, डॉ. दीपक पाटील, अभिजित शिंदे उपस्थित होते.पेठेतील लोक गप्प बसले असते कायगेल्या सहा महिन्यांपासून काम पूर्ण झालेले नाही. परिसरात ज्येष्ठ नागरिक असून, त्यांची तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका येथे येऊ शकत नाही. एखाद्या पेठेत असे काम रखडले असते तर ते गप्प बसले असते काय ?, आमच्या सहनशीलतेचे अंत पाहू नका, अशा शब्दांत नागरिकांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांची खरडपट्टी केली. काम पूर्णत्वाची लेखी डेडलाईन दिल्याशिवाय पुन्हा काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली.चर्चेचे फड रंगविण्यापेक्षा समस्या सोडवा : आमदार जाधव ही भडकलेकाम सुरू करतेवेळी काम केव्हा पूर्ण होणार याचे फलक का लावला नाही. कामाच्या संपूर्ण माहितीचे फलक तातडीने लावा. नुसत्याच चर्चेचे फड रंगविण्यापेक्षा समस्या तातडीने कशी सुटेल, यासाठी प्रयत्न करा, असे खडेबोल आमदार जाधव यांनी जलअभियंता आणि ठेकेदाराला सुनावले. निधीमुळे नव्हे, पावसामुळे कामाला विलंबराजहंस प्रिंटिंग पे्रस परिसरात अनेक वर्षांपासून पावसाळ्यामध्ये सांडपाणी येते. येथील कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी २४ मे रोजी कामाला सुरुवात केली. जुलैअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती; परंतु महापूर आणि त्यानंतर सततच्या पावसामुळे तसेच काळी माती असल्यामुळे खुदाईला अडथळे निर्माण झाले. निधी नाही म्हणून काम थांबले नाही तर पावसामुळेच कामाला विलंब झाल्याची कबुली महापालिका प्रशासनाने यावेळी दिली. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरMLAआमदार