कोल्हापूर शहरात बुधवारपासून पाणी बिलाचे स्पॉट बिलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 18:08 IST2018-04-27T18:08:50+5:302018-04-27T18:08:50+5:30
पाणी बिलाची रक्कम जागेवर भरणा करण्याकरिता ‘स्पॉट बिल वसुली’ हा प्रकल्प शहराच्या काही भागांमध्ये सुरू करण्यात आला होता. तो सुरळीत सुरू झाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये बुधवार (दि. २ मे) पासून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिकेतर्फे पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्यासाठी २०१६ पासून ‘स्पॉट बिलिंग’ हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला.

कोल्हापूर शहरात बुधवारपासून पाणी बिलाचे स्पॉट बिलिंग
कोल्हापूर : पाणी बिलाची रक्कम जागेवर भरणा करण्याकरिता ‘स्पॉट बिल वसुली’ हा प्रकल्प शहराच्या काही भागांमध्ये सुरू करण्यात आला होता. तो सुरळीत सुरू झाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये बुधवार (दि. २ मे) पासून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर महापालिकेतर्फे पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्यासाठी २०१६ पासून ‘स्पॉट बिलिंग’ हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला.
तरी सर्व नागरिकांनी व शहर पाणीपुरवठा केंद्रांवर अवलंबून असलेल्या आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, महापालिकेकडील नागरी सुविधा केंद्राकडे पाणी बिल भरणा करून घेण्यात येत असले तरी, ज्यांना नागरी सुविधा केंद्रामध्ये पाणी बिल भरणा करणे शक्य होत नाही, अशा नागरिकांनी शहर पाणीपुरवठा विभागाकडील आपल्या भागातील संबंधित मीटर रीडर यांच्याकडे आपले पाणी बिल भरणा करावे व त्याची रीतसर पोहोच पावती घ्यावी. याबाबतचे पत्रक पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता यांनी दिले आहे.