शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

corona virus : ऐन गणेशोत्सवात सातवणे गावकऱ्यांचा इशारा, गावात याल तर ५०० चा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 14:01 IST

लोकशाहीत कुणालाही कुठेही संचार करण्याची मुभा आहे. परंतु, आमच्या गावात याल तर ५०० रूपये दंड द्यावा लागेल, असा इशारा चंदगड तालुक्यातील सातवणे ग्रामस्थांनी दिला आहे. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ऐन गणेशोत्सवात सातवणेकरांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा केवळ कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर सुरू आहे.

ठळक मुद्देसातवणेत याल तर ५०० चा दंड..,गावकऱ्यांचा इशारा कोरोनाला रोखण्यासाठी ऐन गणेशोत्सात गावबंदी

राम मगदूम

गडहिंग्लज : लोकशाहीत कुणालाही कुठेही संचार करण्याची मुभा आहे. परंतु, आमच्या गावात याल तर ५०० रूपये दंड द्यावा लागेल, असा इशारा चंदगड तालुक्यातील सातवणे ग्रामस्थांनी दिला आहे. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ऐन गणेशोत्सवात सातवणेकरांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा केवळ कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर सुरू आहे.हकीकत अशी, सातवणे हे गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील ३८० उंबऱ्याच, १६०० लोकवस्तीच गाव. देखाव्यांचे गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. दरवर्षी गणेशोत्सवात येथील प्रत्येक घरात गणपतीचा सुंदर आरास व ज्वलंत प्रश्नांसह ऐतिहासिक प्रसंगावर सजीव देखावे साकारले जातात. त्यामुळे दरवर्षी सीमाभागातील गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी याठिकाणी गर्दी करतात.दरम्यान, गेली ५ महिने देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढते आहे. परंतु, सातवणेकरांनी अद्याप कोरोनाला गावात प्रवेश करू दिलेला नाही. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांच्या संपर्कामुळे गावातील नागरिकांना संसर्ग होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत बाहेर गावच्या माणसांनी सातवणे गावात प्रवेश केला तर त्याच्याकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर गावचा नियम मोडून कुणी गावात आल्यास त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.कोरोनाचा संसर्ग आणि फैलाव टाळण्यासाठी सरकारने देशात संचारबंदी आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. त्यानंतर टप्या-टप्याने अनलॉकची प्रक्रियादेखील सुरू झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य बसफेऱ्याही सुरू झाल्या. परंतु, कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी ऐन गणेशोत्सवात गावबंदीचा निर्णय घेवून सातवणेकरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 दरवर्षी सातवणेमधील देखावे पाहण्यासाठी हजारो लोक येतात. परंतु, यावर्षी सगळीकडे कोरोनाचा थैमान सुरू आहे. देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे गावातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकरता येत आहे. त्यामुळे यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा आणि बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे.- रामभाऊ पारसे, सरपंच सातवणे, ता. चंदगड.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेशोत्सव