मलकापूर पालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:23+5:302021-01-13T05:00:23+5:30

मलकापूर प्रतिनिधी : सेवा निवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी मलकापूर नगरपलिकेच्या सेवानिवत्त कर्मचारी श्रीमती येसाबाई जगन्नाथ कांबळे या २६ ...

Warning of self-immolation in front of Malkapur Municipality | मलकापूर पालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा

मलकापूर पालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा

मलकापूर प्रतिनिधी : सेवा निवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी मलकापूर नगरपलिकेच्या सेवानिवत्त कर्मचारी श्रीमती येसाबाई जगन्नाथ कांबळे या २६ जानेवारी रोजी मलकापूर नगरपालिकेसमोर आत्मदहन असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, शाहूवाडी पोलीस ठाणे, तहसीलदार शाहूवाडी, मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले की मलकापूर नगरपालिकेकडे गेली २८ वर्षे सफाई कामगार म्हणून सेवा केली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी मी सेवनिवृत्त झालो आहे. सेवानिवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी नगरपालिका कार्यालयाकडे हेलपाटे मारले आहेत. वारंवार आश्वासने देऊन प्रशासनाने फसवणूक केली आहे. सेवानिवृत्तीची रक्कम मिळावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर २६ जानेवारी रोजी कुंटुबांसह आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Warning of self-immolation in front of Malkapur Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.