शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ग्रामपंचायत निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, प्रभाग रचना निश्चित, घोषणा सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 1:53 PM

निवडणूक आयोगाने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर कोरोनामुळे स्थगित झालेल्या जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नव्याने काउंटडाऊन सुरू झाले आहे. डिसेंबर अथवा नवीन वर्षात निवडणुका होतील, असे गृहीत धरून प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून त्याची औपचारिक घोषणा सोमवारी (दि. २ नोंव्हेबर) होणार आहे. याचवेळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर कोरोनामुळे स्थगित झालेल्या जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नव्याने काउंटडाऊन सुरू झाले आहे. डिसेंबर अथवा नवीन वर्षात निवडणुका होतील, असे गृहीत धरून प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून त्याची औपचारिक घोषणा सोमवारी (दि. २ नोंव्हेबर) होणार आहे. याचवेळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे.मार्चमध्ये आलेल्या कोरोना व लॉकडाऊनमुळे जून व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या राज्यातील दीड हजारांवर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला होता. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या कुंभवडे व मांजरे (ता.शाहूवाडी), पोंबरे (ता.पन्हाळा), चिंचणे (ता.चंदगड) चार ग्रामपंचायतींची प्रभागासह सर्व कार्यक्रम पूर्ण होऊनदेखील निवडणूक स्थगित करण्यात आली. इतर ४२५ गावांच्या मुदत डिसेंबरमध्ये संपत आहेत.आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने या निवडणुकीचे बिगुल वाजविण्यात आले आहे. त्याची प्रभाग निश्चितीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण झाली आहे. तथापि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तो २ नोव्हेंबरलाच अधिकृतपणे जाहीर होणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेधथेट जनतेतून सरपंच निवडण्याचा मागील सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुका जुन्या पद्धतीने होणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांतूनच सरपंच निवड होणार आहे. त्यासाठीची आरक्षण प्रक्रिया प्रभाग निश्चितीनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे प्रभाग व सरपंच पदाचे आरक्षण काय पडते, याकडे आता लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीची कसोटीप्रभाग निश्चिती झाल्यानंतर खऱ्याअर्थाने गावोगावी धुरळा उडणार आहे. दिवाळीनंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेतृत्वाची व महाविकास आघाडी पॅटर्नची कसोटी लागणार आहे.येथे होणार निवडणुका

  • करवीर ५४
  • गडहिंग्लज ५०
  • भुदरगड ४५
  • पन्हाळा ४१
  • शाहूवाडी ३९
  • शिरोळ ३३
  • आजरा २६
  • हातकणंगले २१
  • राधानगरी १९
  • गगनबावडा ०८
  • चंदगड ०४
टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर