शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणे’ला मंजुरी केंद्र शासनाची, बदल राज्य शासनाचा..!

By admin | Updated: August 3, 2014 22:48 IST

पाणी योजना : माजी सत्ताधाऱ्यांसह अधिकारी अडचणीत, राजकारणामुळे सांगली, कुपवाडचा पाणीप्रश्न रेंगाळला

सांगली : वारणा उद्भव पाणी योजनेला केंद्र शासनाने मंजुरी दिली असताना, या योजनेच्या मूळ स्वरुपात बदल करण्यास राज्य शासनाची मान्यता घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तत्कालीन सत्ताधारी विकास महाआघाडी व अधिकारी कोंडीत सापडले आहेत. महापालिकेतील काँग्रेसच्या कारभारावर हल्लाबोल करणाऱ्या राष्ट्रवादीनेही या प्रकाराबाबत सातत्याने सारवासारवीची भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आल्याने भविष्यात वारणेचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सांगली व कुपवाड या दोन शहरांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. कृष्णेच्या पाण्यात शेरीनाल्याचे पाणी मिसळते. शिवाय उन्हाळ्यात कृष्णेचे पात्र कोरडे पडते. त्यासाठी काँग्रेसने वारणा नदीतून पाणी उचलण्याची योजना आखली. वारणा उद्भव पाणी योजनेला ७९ कोटींची मंजुरी देत केंद्राने ८० टक्के निधी दिला. उर्वरित दहा टक्के राज्याचा व दहा टक्के महापालिकेचा हिस्सा होता. त्यानुसार योजनेसाठी १४ कोटींचा पहिला हप्ता आला. पण त्यानंतर महापालिकेत राष्ट्रवादी, भाजपसह इतर पक्षांची विकास महाआघाडी सत्तेवर आली. महाआघाडीने या योजनेचा प्रारंभ करीत शहरात पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत तब्बल ८ टाक्या उभ्या केल्या असून, आणखी पाच टाक्यांचे काम प्रगतीपथावर आहे. शेकडो किलोमीटरची पाईपलाईनही झाली आहे. पण पिण्याचे पाणी मात्र कृष्णेतूनच देण्यात येते.वास्तविक समडोळी येथून पाईपलाईन टाकून वारणेतून पाणी उचलण्यासाठी केंद्राने मंजुरी दिली होती. या मूळ स्वरुपात महाआघाडीने बदल केला आणि कृष्णेतूनच पाणी उचलण्यास मान्यता घेतली. पण मान्यता घेतानाही हातचलाखी करण्यात आली. केंद्राने ८० टक्के निधी दिला असताना त्यांची मान्यता न घेता राज्य शासनाच्या परवानगीवर योजना पुढे रेटण्यात आली. शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी केंद्राची मान्यता घेतली नसल्याचे कबूल केल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही महाआघाडीच्या नेत्यांनी वारणेबाबत सारवासारवीची भूमिका घेतली होती. महापालिका निवडणुकीतही, वारणेच्या योजनेत तात्पुरता बदल केला असून, भविष्यात निधीची उपलब्धता करून वारणेतून पाणी उचलणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यानंतर तसा कोणताही प्रयत्न झालेला नाही. (प्रतिनिधी)महापालिकेतील पाणी, रस्ते, गटारी, स्वच्छतेच्या प्रश्नांवर गत आठवड्यात राष्ट्रवादीने मोर्चा काढून हल्लाबोल केला होता. सत्ताधाऱ्यांवर गंभीर टीकाही करण्यात आली होती. वारणा पाणी योजनेतील बदलाचा प्रश्न उपस्थित करून एकाचवेळी राष्ट्रवादी व भाजपला शह देण्याची खेळी सत्ताधाऱ्यांनी खेळली आहे.