शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील २८ हजार वीज ग्राहकांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: August 31, 2015 00:44 IST

‘महावितरण आपल्या दारी’ : परिमंडळात १८०० नवे रोहित्र उभारणार

कोल्हापूर : ओव्हरलोडची समस्या आणि काही तांत्रिक कारणांमुळे नियमांनुसार पैसे भरूनदेखील वीज जोडणीची (कनेक्शन) ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत होती. गेल्या तीन वर्षांपासून अशा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सुमारे २७ हजार ग्राहकांची आता प्रतीक्षा संपली आहे. संबंधित ग्राहकांना वीज जोडणी लवकरात लवकर देण्यासाठी ‘महावितरण’ने कोल्हापूर परिमंडळात १८०० नवीन रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. परिमंडळात सध्या कार्यान्वित असलेल्या रोहित्रांमध्ये ओव्हरलोडची समस्या उद्भवत असल्याने तेथून नवीन वीजजोडणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नाही. नियमांनुसार शुल्क भरूनही (पेड पेडिंग) कोल्हापूर जिल्ह्यातील ८ हजार आणि सांगलीतील २० हजार ग्राहक नव्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना वीज जोडणी देण्यासाठी ‘महावितरण’ने कोल्हापूर परिमंडळात एकूण १८०० नवीन रोहित्र उभारणी आणि एच. टी., एल. टी. लाईन उभारणीचे काम सुरू केले आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याचे ‘महावितरण’चे नियोजन आहे. महावितरणच्या नव्या रोहित्र उभारणीच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेतील ग्राहकांची घरे लवकरच विजेच्या प्रकाशामुळे लखलखणार आहेत. (प्रतिनिधी)पाचशे कोटींचा पायाभूत आराखडाग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा पुरविण्यासाठी ‘महावितरण’कडून पाचशे कोटी रुपयांचा पायाभूत आराखडा कोल्हापूर परिमंडळासाठी राबविण्यात येत आहे. त्यात कोल्हापूरसाठी तीनशे आणि सांगलीसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी आहे. त्यातून कोल्हापूरमध्ये २८ नवीन उपकेंद्रे (सबस्टेशन) आणि सांगलीत ३० उपकेंद्रांची उभारणी केली जाणार आहे. त्यासह सध्या कार्यरत असलेली उपकेंद्रे, ट्रान्स्फॉर्मरचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. या पायाभूत आराखडा योजना दोन अंतर्गत सध्या नव्या रोहित्र उभारणीचे काम होत आहे.पैसे मागितल्यास ‘लाचलुचपत’शी बोलावीज जोडणीची प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचे परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमांतर्गत रोहित्र, एच. टी., एल.टी.ची लाईन उभारण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. या कामासाठी लागणाऱ्या वाहिन्या उपलब्ध करून देणे. सामानांची वाहतूक करणे अशी सर्व जबाबदारी ठेकेदारांची आहे. यामुळे ग्राहकांनी अनाधिकृतपणे साहित्याची खरेदी, वाहतूक तसेच आर्थिक व्यवहार करू नये. कोणत्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले