वडणगे सेवा संस्था उभारणार सौरऊर्जा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:04+5:302021-04-05T04:21:04+5:30
संस्थेचे नऊ विभाग आहेत. विजेचा वाढता वापर व सतत वाढणारे वीजदर यामुळे संस्थेने सोलर सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेतला. ...

वडणगे सेवा संस्था उभारणार सौरऊर्जा प्रकल्प
संस्थेचे नऊ विभाग आहेत. विजेचा वाढता वापर व सतत वाढणारे वीजदर यामुळे संस्थेने सोलर सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेतला. वार्षिक सर्वसाधारण सभेची याला मंजुरी घेण्यात आली असून, यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून एका कंपनीची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या मंगल कार्यालयाच्या छतावर हा प्रकल्प उभारला जाणार असून यासाठी बारा लाख रुपयांचा खर्च आहे.
या प्रकल्पातून दररोज शंभर युनिट वीजनिर्मिती होईल. सुरुवातीला गिरण विभागात या विजेचा वापर केला जाणार आहे . टप्प्या-टप्प्याने सर्व विभागात या प्रकल्पातून तयार होणारी वीज वापरली जाणार आहे.
प्रकल्पासाठी नाबार्डकडून अर्थसाहाय्य मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल. या प्रकल्पासाठी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित अस्वले यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.