‘विवेकानंद’ ची सांघिक विजेतेपदाची ‘दशकपूर्ती’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 22:01 IST2017-09-27T21:59:22+5:302017-09-27T22:01:24+5:30

‘विवेकानंद’ ची सांघिक विजेतेपदाची ‘दशकपूर्ती’
कोल्हापूर : लक्षवेधक कलांचे सादरीकरण करत कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या ३७ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या सांघिक सर्वसाधारण विजेतेपदावर सलग दहाव्यावर्षी नाव कोरले. फलटणच्या मुधोजी कॉलेजने वैयक्तीक सर्वसाधारण विजेतेपदासह लोककला प्रकारातील विजेतेपद पटकविले. आजरा महाविद्यालयाने लोकनृत्यामध्ये बाजी मारली. या महोत्सवाच्या बक्षीस वितरणा समारंभाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. विजयी संघातील कलाकार, त्यांच्या पाठीराख्यांनी टाळ्या, शिटट्या आणि नृत्याचा फेर धरत आणि पावसाच्या सरी अंगावर घेत आनंदोत्सव साजरा केला.