शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन १५ दिवस बंद

By admin | Updated: July 14, 2015 01:11 IST

२३ जुलैपासून मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्यातर्फे २३ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीत रासायनिक संवर्धन प्रक्रिया होणार आहे़ त्यामुळे या कालावधीत श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही़ या काळात भाविकांसाठी उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनाची सोय करण्यात आली आहे़ उत्सवमूर्तीचे दर्शन पितळी उंबऱ्यापासून घेता येईल़ ६ आॅगस्टला सायंकाळी देवीचे दर्शन पूर्वीप्रमाणे घेता येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ़ अमित सैनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़ अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत श्री पूजक आणि देवस्थान समितीची बैठक शिवाजी पेठ येथील देवस्थान समितीच्या कार्यालयात झाली़ या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ़ सैनी यांनी ही माहिती दिली़ या पत्रकार परिषदेस समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्य हिरोजी परब, प्रमोद पाटील, बी़ एऩ पाटील-मुगळीकर, संगीता खाडे, श्री पूजक मंडळाचे अजित ठाणेकर, गजानन मुनीश्वर, माधव मुनीश्वर, प्रसाद मुनीश्वर, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते़ डॉ़ सैनी म्हणाले, २२ जुलैला मूर्तीशी संबंधित धार्मिक विधी होणार आहेत़ यानंतर मूर्तीवर पुरातत्व खात्यातर्फे २३ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीत रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे़ या काळात मूर्तीवर भक्तांकडून कोणत्याही प्रकारचा अभिषेक करता येणार नाही़ मंदिराची स्वच्छता करणे समितीला आणि श्री पूजकांना शक्य व्हावे, यासाठी ही प्रक्रिया ४ आॅगस्टपर्यंत पूर्ण करावी, अशी विनंती पुरातत्व खात्याला केली आहे़ रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यान मंदिराच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणाला परवानगी नाही़ मंदिरातील पडद्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे़ तसेच चित्रीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे़ मंदिराशी संबंधित धार्मिक विधी हे गरूड मंडप, गारेच्या गणपतीसमोर करण्यात येतील, अशी माहिती डॉ़ सैनी यांनी दिली़