व्हिजन ॲग्रो फसवणूक : खुडेसह सर्व संशयितांच्या मालमत्तेवर टाच आणा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:03 PM2020-11-11T19:03:27+5:302020-11-11T19:07:52+5:30

police, fraud, shiv sena, kolhapurnews गुंतवणुक केलेल्या पैशावर मोठ्या रकमेचे अमीष दाखवून गुंतवणुक दारांना कोट्यावधींचा गंडा घालणार्या व्हिजन ॲग्रोच्या सर्व सशयीत संचालकांच्या मालमत्तेवर टाचा आणा, त्यातून गुंतवणुकदारांची रक्कम परत करा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने मंगळवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. शिष्ठमंडळाने पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Vision Agro Fraud: Bring the heel on the property of all the suspects including Khude ... | व्हिजन ॲग्रो फसवणूक : खुडेसह सर्व संशयितांच्या मालमत्तेवर टाच आणा...

व्हिजन ॲग्रो फसवणूक : खुडेसह सर्व संशयितांच्या मालमत्तेवर टाच आणा...

Next
ठळक मुद्देव्हिजन ॲग्रो फसवणूक : खुडेसह सर्व संशयितांच्या मालमत्तेवर टाच आणा...शिवसेनेनेही तक्रारदारांची मांडली व्यथा; मागणी ६४ तक्रारी दाखल

कोल्हापूर : गुंतवणुक केलेल्या पैशावर मोठ्या रकमेचे अमीष दाखवून गुंतवणुक दारांना कोट्यावधींचा गंडा घालणार्या व्हिजन ॲग्रोच्या सर्व सशयीत संचालकांच्या मालमत्तेवर टाचा आणा, त्यातून गुंतवणुकदारांची रक्कम परत करा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने मंगळवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. शिष्ठमंडळाने पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्‍टस व व्ही. ॲण्ड के. ॲग्रोटेक प्रॉडक्‍टस प्रा. लिमिटेड कंपनीनीने केलेल्या फसवणुकीबाबत शिवसेनेकडे वाशी (ता. करवीर) येथील गुंतवणुकदारांनी तक्रारी केल्या. पोलिसांचा तपास जलदगतीने व्हावा व आपले गुंतवलेले पैसे परत मिळावेत अशी मागणी यावेळी गुंतवणुकदारांनी शिवसेनेकडे केली होती, त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने उपअधीक्षक कदम यांची भेट घेऊन चर्चा केली.

या कंपनीच्या संशयीत संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणा, पैसे परत मिळवून देण्याच्या अमीषाने एजंटांची तयार झालेली टोळी शोधून त्यांचा बंदोबस्त करावा अशीही मागणी शिष्ठमंडळाने केली. यावेळी वाशीतील कृष्णात मेटील व अरुण मोरे या दोन गटांने ५७ गुंतवणुकदारांची ग्रुप तक्रार मांडून त्यांचेच सुमारे ८४ लाखाची फसवणक झाल्याची व्यथा मांडली.

६४ तक्रारी दाखल; आतापर्यत ३० लाखाची मालमत्ता जप्त

उप-अधीक्षक कदम म्हणाल्या, या कंपनीचा संशयित संचालक सुशील पाटीलवर सप्टेंबरमध्येच कारवाई केल्याने तो कारागृहात आहे. सुत्रधार संशयित विकास खुडेला दोन दिवसापूर्वी अटक केली. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत दि. नोव्हेंबर पर्यंत वाढ केली आहे. त्याची पत्नी विद्या खुडेला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्याच्याकडेही चौकशी सुरू आहे.

अन्य संशयित प्रसाद पाटील व डॉ. तुकाराम पाटील या दोघेही गायब आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. संशयितांच्या मालमत्ता शोधकाम सुरू आहे. त्यावर टाच आणण्यात येणार आहे. आतापर्यंत ६४ जणांच्या तक्रारी नोंद झाल्या, संशयीत मुख्य सुत्रधार खुडे, सुशील पाटीलकडून २३ तोळे दागिन्यासह एक कार व एक दुचाकी असा सुमारे ३० लाखांची मालमत्ता जप्त केल्याचे सांगितले.


व्हिजन ॲग्रोमध्ये फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी जास्तीत जास्त संख्येने तक्रारी नोंदवाव्यात तसेच संशयितांच्या मालमत्तेची माहिती द्यावी, त्या मालमत्तेची चौकशी करुन त्यावर टाच आणू.
- पद्मा कदम,
पोलीस उपअधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, कोल्हापूर.
 

Web Title: Vision Agro Fraud: Bring the heel on the property of all the suspects including Khude ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.