शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बनावट नोटा प्रकरणातील विश्वनाथ जोशी याला नृसिंहवाडीत अटक, पाच वर्षापासून होता फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:51 IST

रमेश सुतार  गणेशवाडी : बनावट नोटा प्रकरणातील पाच वर्षापासून फरार असणाऱ्या मुख्य आरोपी विश्वनाथ सुहास जोशी (वय ४४) याला ...

रमेश सुतार गणेशवाडी : बनावट नोटा प्रकरणातील पाच वर्षापासून फरार असणाऱ्या मुख्य आरोपी विश्वनाथ सुहास जोशी (वय ४४) याला नृसिंहवाडीतून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. जोशी हा मूळचा तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावचा रहिवासी असून २०१९ पासून तो फरारी होता.  याबाबत माहिती अशी की, गांधीनगरमध्ये २० जानेवारी २०१९ मध्ये उचगाव येथील अभिजीत राजेंद्र पवार याला बनावट नोटाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी ७ हजार ५५० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या. पोलिस तपासात विश्वनाथ सुहास जोशी आणि प्रवीण अजित कुमार उपाध्ये यांनी सांगली येथे नोटा तयार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शामराव नगर मधील एका बंगल्यात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करण्याचा कारखान्यांवर छापा टाकला. यामध्ये स्कॅनर, प्रिंटरही जप्त करण्यात आला.

यावेळी अभिजीत राजेंद्र पवार आणि प्रवीण अजित कुमार उपाध्ये यांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी विश्वनाथ सुहास जोशी हा फरार होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनय झिंजुर्के करीत आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस