व्हिसा कायद्याचे उल्लंघन, इंडोनेशियासह दिल्लीहून आलेल्या १२ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:25 IST2020-06-02T19:24:09+5:302020-06-02T19:25:20+5:30

इंडोनेशियाहून आलेल्या दहा आणि दिल्लीहून आलेल्या दोघांना अशा एकूण बारा जणांना व्हीसा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Violation of visa law, arrest of 12 people from Delhi including Indonesia | व्हिसा कायद्याचे उल्लंघन, इंडोनेशियासह दिल्लीहून आलेल्या १२ जणांना अटक

व्हिसा कायद्याचे उल्लंघन, इंडोनेशियासह दिल्लीहून आलेल्या १२ जणांना अटक

ठळक मुद्देव्हिसा कायद्याचे उल्लंघन इंडोनेशियासह दिल्लीहून आलेल्या १२ जणांना अटक

बेळगाव : इंडोनेशियाहून आलेल्या दहा आणि दिल्लीहून आलेल्या दोघांना अशा एकूण बारा जणांना व्हीसा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

१२ मार्च रोजी हे बारा जण धर्मप्रसार करण्यासाठी बेळगावला आले होते.१५ मार्च पर्यन्त त्यांनी धर्मप्रसारचे कामही केले.नंतर कोरोनाचा फैलाव होत असताना या बारा जणांची माहिती मिळाली. त्यामुळे माळमारुती पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल करून प्रार्थनास्थळात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते.

व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या बारा जणांवर ठेवण्यात आला आहे.त्यांची वैद्यकीय तपासणी करून माळमारुती पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले.नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

Web Title: Violation of visa law, arrest of 12 people from Delhi including Indonesia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.