शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

करिअर रखडले; उत्सवात विघ्न, कोल्हापुरात ९६१ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:24 IST

क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले

उद्धव गोडसेकोल्हापूर : गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतलेल्या ९६१ जणांवर पोलिसांनी गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण १४९ गुन्ह्यांपैकी १७ गुन्ह्यांचा निकाल लागला असून, ११३ खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले आहे, तर अनेकांना पासपोर्ट मिळण्यात ही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तरुणांचे करिअर पणाला लावायचे का? याचा मंडळांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.उत्सव उत्साहात साजरे व्हायला पाहिजेत, यात दुमत नाहीच. पण, उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते. विना परवानगी मंडप उभारणे, डीजे लावून आवाजाचा दणदणाट करणे, मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर लावून वाहतुकीला अडथळा करणे, मिरवणूक मार्गात मुद्दाम थांबून इतर मंडळांची अडवणूक करणे, मारामारी करणे, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार मंडळांकडून होतात. याचा त्रास अन्य मंडळांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागिरकांना सहन करावा लागतो.

त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. गेल्या पाच वर्षात पोलिसांनी जिल्ह्यात असे १४९ गुन्हे दाखल करून ९६१ जणांवर कारवाई केली. त्यापैकी १७ गुन्ह्यांचा न्यायालयात निकाल लागला असून, ११३ खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.

तरुणांच्या करिअरला धोकागुन्हे दाखल झालेल्या संशयितांमध्ये बहुतांश तरुण आहेत. पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या चारित्र्य पडताळणी दाखल्यात गुन्ह्यांची नोंद होणार आहे. यामुळे उत्सवांमध्ये अतिउत्साह दाखवणाऱ्या तरुणांचे करिअर धोक्यात आले आहे. गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना याचा फटका सहन करावा लागत आहे.भाग पाच आणि सहाचे गुन्हेभाग पाच आणि सहा म्हणजे मारामारी, मिरवणुकीत गोंधळ घालणे, पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे ८९ गुन्हे दाखल झाले असून, त्या अंतर्गत ६७३ जणांवर कारवाई सुरू आहे.

ध्वनी प्रदूषणाचे गुन्हेगुन्हे - ४१आरोपी - २३१अदखलपात्र गुन्हेगुन्हे - १९आरोपी - ५७

उत्सव काळात नकळतपणे तरुणांकडून काही गुन्हे घडतात. काही ठिकाणी तरुण जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतात. गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे तरुणांनी अशा घटनांपासून दूर राहावे. - महेंद्र पंडित - पोलिस अधीक्षक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस