शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha2024: आचारसंहितेचा भंग, कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:37 IST

मोबाइलद्वारे ईव्हीएमचे व्हिडीओ चित्रीकरण

कोल्हापूर : सोशल मीडियावर निवडणुकीच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या जिल्ह्यात ११ घटना निदर्शनास आल्या असून, यातील ५ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित ६ जणांवरही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.येडगे म्हणाले, सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवरुन निवडणुकीच्या आचारसंहितचे उल्लंघन करू नका, अशा सूचना दिल्या होत्या. याचे उल्लंघन, गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी वेगळी टीम कार्यरत केली होती. अनेकांनी मतदान करताना मोबाइलद्वारे व्हिडीओ शूटिंग करत ते व्हायरल केले आहे. यामुळे मतदान गोपनीयतेचा भंग झाला आहे. असे प्रकार जिल्ह्यात ११ ठिकाणी आढळून आले आहेत.यात चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील असे प्रकार करणाऱ्या लोकांची ओळख पटली आहे. यातील पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. उर्वरित ६ जणांवरही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, असे येडगे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पाेलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते.

ईव्हीएम मशीनचे चित्रीकरणमतदान केंद्रात जाताना मोबाइल नेऊ नका, अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या होत्या. मात्र, अनेकांनी त्याचे उल्लंघन करत मोबाइलद्वारे ईव्हीएमचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे अशा लोकांवर गुन्हे दाखल केले असल्याचे येडगे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Code of conductआचारसंहिताVotingमतदानCrime Newsगुन्हेगारी