विनता जोशी यांनी करवीरवासीयांना ठेवले खिळवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 04:48 PM2019-12-17T16:48:09+5:302019-12-17T16:56:25+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा पोवाड्याच्या माध्यमातून वेध घेत त्यांच्याच नात विनता जोशी यांनी करवीरवासीयांना खिळवून ठेवले.

Vinita Joshi kept the kariviris in the crease | विनता जोशी यांनी करवीरवासीयांना ठेवले खिळवून

शाहीर विनता जोशी यांनी ‘नमन वीरतेला’ कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देविनता जोशी यांनी करवीरवासीयांना ठेवले खिळवून पोवाड्याच्या माध्यमातून सावरकरांचे तेजस्वी दर्शन

कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा पोवाड्याच्या माध्यमातून वेध घेत त्यांच्याच नात विनता जोशी यांनी करवीरवासीयांना खिळवून ठेवले.

येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाच्या वतीने सोमवारी राम गणेश गडकरी सभागृहामध्ये ‘नमन वीरतेला’ या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांच्या विनता या नात आहेत.

लहानपणीच सावरकरांनी घेतलेली स्वातंत्र्याची शपथ, शाळकरी वयातच असलेले क्रांतिकारी विचार, शिवछत्रपती शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बॅरिस्टर पदवीसाठी लंडनला प्रयाण, तेथे राहूनही भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी मार्गांचा अवलंब, ब्रिटिशांकडून झालेली दोन जन्मठेपांची शिक्षा, मार्सेसिस बंदरातील उडी, साहित्यिक कर्तबगारी आणि अस्पृश्यांच्या उद्धारासाठीचे कार्य असा आढावा यावेळी जोशी यांनी पोवाड्याच्या माध्यमातून मांडला.

मंडळाचे अध्यक्ष नितीन वाडीकर, एस. के. कुलकर्णी, शालन शेटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अपर्णा फडके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विकास परांजपे, शाहीर आझाद नायकवडी, शाहीर राजू राऊत, प्रफुल्ल जोशी, उदय मालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 

 

Web Title: Vinita Joshi kept the kariviris in the crease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.