शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विनय कोरे हे शांतीतून क्रांती करणारे नेतृत्व - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:31 IST

एकमेकांवर स्तुतिसुमने

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार विनय कोरे यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. भाजप आणि जनसुराज्य पक्षाचे परस्पर संबंध किती घनिष्ट आहेत हेच यावरून स्पष्ट झाले. दुपारी ३:५३ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम ४ वाजून ४८ मिनिटांनी संपला. राष्ट्रपती येण्याआधी सात मिनिटे राज्यपालांसह सर्व मान्यवर आधी व्यासपीठावर येऊन बसले होते.फडणवीस म्हणाले, आमचे मित्र विनय कोरे हे शांतीतून क्रांती घडवणारे असे व्यक्तिमत्त्व आहे. राजकारण करतानाही सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे हाच त्यांचा नेहमी विचार असतो. प्रास्ताविकात कोरे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. ते म्हणाले, फडणवीस यांच्यामुळेच आज राष्ट्रपतींचा सन्मान करण्याची संधी आम्हा वारणावासीयांना मिळाली आहे. यावेळी कोरे यांनी या कार्यक्रमादिवशी वारणा विद्यापीठाचे उद्घघाटन करण्यासाठी मंत्री चंद्रकात पाटील यांनी जातीने लक्ष घालून कमी कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून ही परवानगी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आम्ही एकत्रचपालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेताना कोरे यांनी आपला दोस्ताना यावेळी जाहीर केला. फडणवीस यांना उद्देशून ते म्हणाले, आम्ही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, दूध संघ अन्य सहकाराच्या राजकारणात गेली अनेक वर्षे एकत्र आहोत. पक्षीय राजकारणात जरी वेगळे होतो तरीही आता तुमच्यामुळे राज्य पातळीवरही एकत्र येण्याची संधी आम्हाला मिळाली.

वारणा परिवाराकडून नेटके नियोजनराष्ट्रपतींच्या या कार्यक्रमाचे वारणा परिवाराकडून नेटके नियोजन करण्यात आले. आधी दोन तास आळंदी येथील कीर्तनकार ज्ञानेश्वर वाबळे, शाहीर डॉ. देवानंद माळी यांचा कार्यक्रम झाला. दुपारी २ पर्यंत चारही सभामंडप भरून गेले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. विविध ठिकाणी पार्किंग केल्याने ती अडचण आली नाही. तरीही प्रचंड गर्दी झाल्याने अनेक महिलांना बाहेर थांबावे लागले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजन ठेवण्यात आले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinay Koreविनय कोरे