वर्षभर विनासुट्टी, मल्लिनाथ कलशेट्टी; कोल्हापूरला प्लास्टिकमुक्त करण्याचा आयुक्तांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 03:44 AM2020-02-23T03:44:41+5:302020-02-23T03:46:02+5:30

कलशेट्टी यांनी आजपर्यंतच्या सेवेत एकदाही वैद्यकीय रजा घेतलेली नसून ते अखंडपणे काम करीत आहेत.

Vinasutti all year, Malinath Kalshetti! | वर्षभर विनासुट्टी, मल्लिनाथ कलशेट्टी; कोल्हापूरला प्लास्टिकमुक्त करण्याचा आयुक्तांचा निर्धार

वर्षभर विनासुट्टी, मल्लिनाथ कलशेट्टी; कोल्हापूरला प्लास्टिकमुक्त करण्याचा आयुक्तांचा निर्धार

Next

- विनोद सावंत 

कोल्हापूर : नोकरदार असो, अधिकारी असो अथवा व्यापारी असो; आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी ठरलेलीच असते. भारतीय प्रशासन सेवेत असणारे कोल्हापूरचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी मात्र याला अपवाद आहेत. वर्षभरात त्यांनी एका दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. कोल्हापूरला प्रथमच असे कार्यक्षम आयुक्त लाभले आहेत.

कलशेट्टी यांनी आजपर्यंतच्या सेवेत एकदाही वैद्यकीय रजा घेतलेली नसून ते अखंडपणे काम करीत आहेत. किंबहुना रविवारी साप्तहिक सुट्टीच्या दिवशी ते कामावर असतात. शहर स्वच्छ करण्याबरोबरच कोल्हापूर हे राज्यातील पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा त्यांचा निर्धार आहे. दर रविवारी ते ‘स्वच्छता अभियान’ राबवितात.

वर्षभरापासून त्यांनी अखंड ४३ रविवार स्वच्छता मोहीम राबविली आहे. ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात.

पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकास साधण्यात त्यांचा हातखंडा आहे. कोल्हापुरात स्वच्छता मोहीम, पुरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केल्याने त्यांचा गौरव झाला होता.

एक दिवसही ‘ब्रेक’ नाही
प्रशासकीय सेवेत असणाऱ्यांना बदलीच्या काळात नऊ दिवस सुट्टी घेण्याची मुभा असते. डॉ. कलशेट्टी हे एक दिवसही विश्रांती न घेता दुसºयाच दिवशी नवीन जागेवर रुजू होतात. बदलीवेळी एक दिवसही सुट्टी न घेणारे अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.

कोल्हापूर महापालिकेला मी आई मानून काम करतो. त्यामुळेच सुट्टीच्या दिवशीही सेवा बजावतो. शिवाजी विद्यापीठातील सेवा योजनेत मी घडलो असल्यामुळे माझे स्वच्छतेला नेहमीत प्राधान्य असते. आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले असून, पुढेही असेच काम करीत राहणार आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महापालिका

Web Title: Vinasutti all year, Malinath Kalshetti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.