शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील विचारे विद्यामंदिरला लवकरच मिळणार इमारत, विद्यार्थी झाडाखाली बसून घेत होते शिक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 16:59 IST

‘लोकमत’ने २० जूनच्या अंकात ‘फुलेवाडीतील विचारे विद्यामंदिरची झाडाखाली भरते शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने या शाळेच्या इमारतीसाठी हालचाली सुरू केल्या

कोल्हापूर : इमारत नसल्याने फुलेवाडीतील सेमी इंग्रजी माध्यमातील रावबहादूर दाजीबा विचारे विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना पत्र्याच्या शेडखाली बसून शिक्षण घ्यावे लागते. याबाबत ‘लोकमत’ने २० जूनच्या अंकात ‘फुलेवाडीतील विचारे विद्यामंदिरची झाडाखाली भरते शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने या शाळेच्या इमारतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी मंगळवारी या शाळेला भेट देऊन सद्य:स्थितीची पाहणी केली. सीएसआरमधून इमारतीसाठी निधी मिळवण्याबाबत महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू असून, रोटरी क्लब व अन्य एका संस्थेचा प्रस्ताव मनपाकडे आला आहे. या संस्थेशी अधिकाऱ्यांची बोलणी सुरू आहे. याबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून या शाळेची इमारत बांधण्यासाठी प्रशासन विचाराधीन असल्याचे शंकर यादव यांनी सांगितले.

खासगी इमारतीत हलविले वर्गया शाळेचा प्रत्येक वर्षी एक-एक वर्ग वाढत आहे. चौथीचा वर्ग एका दुकानाच्या शेडखाली भरवला जात होता. याच परिसरातील खासगी व्यक्तीच्या तीन खोल्या महापालिकेने ताब्यात घेतल्या असून, या इमारतीत मंगळवारी चौथीचा वर्ग भरविण्यात आला.

बीडी कामगार वसाहतीमध्ये जागेचा प्रस्तावशाळेच्या नियोजित इमारतीसाठी येथील बीडी कामगार वसाहतीमधील २० गुंठ्यांपेक्षा अधिकच्या जागेचा प्रस्ताव आहे. या जागेवर चार खोल्यांची इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्यापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही. नवीन शाळेला मिळणारा प्रतिसाद पाहूनच इमारतीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या शाळेतील प्रवेश फुल्ल होत आहेत. त्यामुळे प्रतिसाद पाहण्यासाठी अजून किती दिवस विनाइमारतीचे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करायला लावणार आहा,त असा सवाल पालकांतून उपस्थित होत आहे.

फक्त सुरुवात करा, लोकसहभागातून निधी जमवूमनपा प्रशासनाने जागा वर्ग करून प्रस्तावित जागेवर सुरुवातीच्या बांधकामासाठी निधी द्यावा, त्यानंतरच्या बांधकामासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याचा बहुतांश पालकांनी निर्धार केला आहे.

सरकारी शाळा टिकाव्यात म्हणून आम्ही पाल्यांना महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे महापालिकेनेही प्रस्तावित जागा महापालिकेकडे वर्ग करून शाळेची इमारत त्वरित उभी करावी. -स्वाती कृष्णात, पालक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी