शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा डंका, काँग्रेसचा सुपडासाफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 13:48 IST

शिंदेसेनेची ताकद वाढली..

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंतच्या इतिहासात महायुतीने सर्वाधिक दणदणीत यश मिळविले. काँग्रेससह महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. जिल्ह्यातील सर्व १० जागा महायुतीने जिंकल्या आहेत. काँग्रेस तिसऱ्यांदा शून्यावर आपटली. भल्याभल्यांचा निकालाचा अंदाज चुकवत जनतेने अत्यंत स्पष्ट कौल दिला. कोल्हापूर उत्तर, करवीर आणि शाहुवाडी मतदार संघात सुरुवातीला थोडी चुरस झाली. उर्वरित सात मतदारसंघांत पहिल्या फेरीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडीच गुलाल लावूनच थांबली.मावळत्या सभागृहात महायुतीचे सहा आमदार होते. काँग्रेसचे चार संख्याबळ होते. या निवडणुकीत काँग्रेसच्या चारही आमदारांचा दारुण पराभव झाला. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार राजेश पाटील चंदगडमधून पराभूत झाले, परंतु तिथे महायुतीतीलच भाजप समर्थक शिवाजी पाटील हे अपक्ष उमेदवार निवडून आले. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेवर शाहू छत्रपती चांगल्या मताधिक्याने विजयी झाले होते. हातकणंगलेतही सत्यजीत पाटील निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे विधानसभेला लोक काय करतात, याबाबत प्रचंड उत्सुकता होती, परंतु लोकांनी एकतर्फीच महायुतीच्या पारड्यात मते टाकली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सलग सहाव्यांदा निवडून येत विजयाची डबल हॅट्ट्रिक केली, असे सलग सहा वेळा निवडून येणारे ते एकमेव आमदार आहेत. स्वत: शरद पवार यांनी गडहिंग्लजमध्ये येऊन मुश्रीफ यांना पाडा, असे तीन वेळा जाहीर करून मुश्रीफ यांनी विजय खेचून आणला व कागलचे परमनंट आमदार आपणच असल्याचे दाखवून दिले. येथे समरजीत घाटगे यांचा सलग दुसऱ्यांदा जिव्हारी लागणारा पराभव झाला.राधानगरीत प्रकाश आबिटकर यांनी त्या मतदारसंघात प्रथमच विजयाची हॅट्ट्रिक केली. शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना या लढाईत आबिटकर यांनी के.पी.पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. इचलकरंजीत भाजपच्या राहुल आवाडे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या मदन कारंडे यांचा पराभव करून इचलकरंजीच्या राजकारणातील आवाडे घराण्याचा आणि भाजपचा वरचष्मा पुन्हा अधोरेखित केला. राहुल हे पहिल्याच प्रयत्नात आमदार झालेले जिल्ह्यातील या निवडणुकीतील एकमेव आमदार आहेत.

कोल्हापूर उत्तरची लढत राज्यात गाजली होती. तिथे काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर यांनी चांगली लढत दिली, परंतु शिंदेसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या अमल महाडिक यांनी काँग्रेसच्या आमदार ऋतुराज पाटील यांचा एकतर्फीच पराभव केला. तिथे आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशी लढत झाली, परंतु त्यात महाडिक गटाने गुलाल खेचून आणला.करवीरमध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्या निधनाबद्दलची सहानुभूती कामी आली नाही. या एकमेव मतदारसंघात राहुल पाटील यांनी जोरदार टक्कर दिली, परंतु शिंदेसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी अखेर बाजी जिंकली. शाहुवाडीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी उद्धवसेनेच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव करून आपणच या मतदारसंघाचे सावकर असल्याचे दाखवून दिले. सत्यजीत यांना लोकसभेपाठोपाठ दुसऱ्या दारुण पराभवास सामोरे जावे लागले.चंदगडमध्ये पंचरंगी लढत झाली, परंतु तिथे महायुती समर्थक अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी महायुतीतीलच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार राजेश पाटील, शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ.नंदिनी बाभूळकर यांचा पराभव केला. शिवाजी पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत.हातकणंगलेत जनसुराज्य शक्तीच्या अशोकराव माने यांनी काँग्रेसच्या राजूबाबा आवळे यांचा पराभव केला. तिथे स्वाभिमानीचे माजी आमदार डॉ.सुजीत मिणचेकर हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. शिरोळला महायुती पुरस्कृत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काँग्रेसच्या गणपतराव पाटील यांचा दणदणीत पराभव केलाच, शिवाय राजू शेट्टी यांचे उमेदवार उल्हास पाटील यांचेही राजकारणच संपुष्टात आणले.

विजयी बलाबल

  • शिंदेसेना : ०३
  • भाजप : ०२
  • जनसुराज्य शक्ती : ०२
  • राष्ट्रवादी अजित पवार पक्ष : ०१
  • महायुती पुरस्कृत शाहू आघाडी : ०१
  • महायुती समर्थक अपक्ष : ०१

२०१९ चे बलाबल

  • काँग्रेस : ०४
  • राष्ट्रवादी : ०२
  • शिंदेसेना : ०१
  • जनसुराज्य शक्ती : ०१
  • अपक्ष : ०२

शिंदेसेनेची ताकद वाढली..

  • मुश्रीफ यांची डबल हॅट्ट्रिक, असे यश मिळविणारे ते जिल्ह्यातील पहिलेच आमदार
  • इतिहास घडविला, प्रकाश आबिटकर यांची हॅट्ट्रिक
  • विनय कोरे यांच्या पक्षाला दोन ठिकाणी लखलखीत यश
  • उद्धवसेना, शरद पवार पक्षाला भोपळा
  • भाजपला पुन्हा घवघवीत यश
  • महाडिक गटाचा दबदबा वाढला
  • राजू शेट्टी लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही झाले रिकामेच
  • आमदार सतेज पाटील यांच्या राजकारणाची पिछेहाट

काँग्रेसचा नामुष्कीजनक पराभव..स्वातंत्र्यानंतर झालेल्या १९५७च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाली होती. तशीच स्थिती २०१४ ला पुन्हा झाली. दहा वर्षांनंतर २०२४ ला लढविलेल्या सर्व पाचही जागांवर काँग्रेसचा नामुष्कीजनक पराभव झाला.

विधानसभानिहाय विजयी उमेदवारांचे मताधिक्य

  • इचलकरंजी : राहुल आवाडे : ५६८११
  • हातकणंगले : अशोकराव माने : ४६२४९
  • शिरोळ : राजेंद्र पाटील-यड्रावकर : ४०८१६
  • राधानगरी : प्रकाश आबिटकर : ३८२५९
  • शाहूवाडी : विनय कोरे : ३६०५३
  • कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर-२९५६३
  • चंदगड : शिवाजी पाटील- २४१३४
  • कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक - १७६३०
  • कागल : हसन मुश्रीफ : ११५८१
  • करवीर : चंद्रदीप नरके : १९७६
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलMahayutiमहायुतीcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024