शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

Kolhapur News: 'कुंभी'तील विजयाने नरके गटाला विधानसभेसाठी बळ, आगामी निवडणुकीत गणिते बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 16:03 IST

विधानसभेतील पराभवानंतर चंद्रदीप नरके यांचे राजकीय खच्चीकरण झाले होते

राजाराम लोंढे कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पॅनलच्या बांधणीपासून अगदी शिस्तबद्ध राबविलेली प्रचार यंत्रणा आणि शेवटच्या टप्प्यात त्यांना एकाकी पाडण्याचा विरोधकांनी केेलेला प्रयत्न व त्यातून निर्माण झालेली सहानुभूती या सगळ्यांमुळे विजयी चौकार खेचण्यात यश आले. या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नरके यांचा आत्मविश्वास दुणावणार हे निश्चित आहे.

सत्तांतर करायचेच, या इराद्याने रिंगणात उतरलेल्या ‘शाहू’ आघाडीने चिवट झुंज दिली, मात्र अंतर्गत उट्टे काढण्याचे राजकारण व सगळे एकत्र येऊन कारखाना चालवू शकतो, हा सभासदांना विश्वास देण्यात कमी पडल्याचा त्यांना फटका बसला.विधानसभेतील पराभवानंतर चंद्रदीप नरके यांचे राजकीय खच्चीकरण झाले होते. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दोन संचालक निवडून आणत त्यांनी पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘करवीर’च्या राजकारणात ‘कुंभी’ची सत्ता महत्त्वाची ठरत असल्याने नरके यांनी दोन वर्षे जोडण्या लावल्या होत्या. नरके यांच्याकडून कारखाना काढून घेण्याचा चंग बांधून गेल्या पाच- सहा वर्षांत विरोधकांनी कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवत कारखान्याची निवडणूक सोपी नाही, असा सत्तारूढ गटाला इशारा दिला होता.

सुरुवातीच्या टप्प्यात विरोधकांमध्ये दोन-तीन गट असले तरी त्यांनी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली एकाच जाजमावर आणून तगडे पॅनल रिंगणात उतरवले. आता नाहीतर कधीच नाही, हे ओळखून खाडे यांनी कमालीच्या जोडण्या लावल्या होत्या. या पॅनलमधील ‘मोहरे’ हे भविष्यातील राजकारणात अडसर ठरणार, म्हणून त्यांना आताच रोखायला हवे, यासाठी एक यंत्रणा सक्रिय झाली आणि त्याचा फटका ‘शाहू’ आघाडीला बसला.सतेज यांच्या पाठिंब्यामुळे नरकेंना बळ‘कुंभी’च्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना एकाकी पाडत त्यांची कोंडी करण्याची व्यूहरचना विरोधकांची होती. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्या पाठिंब्याने नरकेंचा हुरूप वाढवलाच, त्याचबरोबर करवीरमधील विरोधकांचे मताधिक्य कमी करण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली.पन्हाळकरांनी चूक सुधारलीविधानसभा निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्याची सल नरके यांना कायम बोचत होती. त्यादृष्टीने त्यांनी गेली दोन वर्षे बांधणी सुरू केली होती. तेथील मताधिक्य पाहता पन्हाळकरांनी चूक सुधारल्याची चर्चा सुरू आहे.अजित यांची ‘चाणक्यनीती’अजित नरके हे या निवडणुकीतील पडद्यामागचे सूत्रधार होते. अरुण नरके हे साथ देणार नाहीत, हे गृहित धरून त्यांनी पन्हाळा व गगनबावड्यात जोडण्या लावल्या. त्यांची चाणक्यनीती पुन्हा एकदा पथ्यावर पडली.

नरके पॅनलच्या विजयाची कारणे :

  • शेतकऱ्यांचा एक रुपयाही थकीत नाही
  • सतेज पाटील यांचे पाठबळ
  • अरुण नरके यांच्या भूमिकेनंतर विशेषत: पन्हाळ्यात फिरलेले वारे
  • नरके घराण्याबाबत सभासदांमध्ये असलेली आत्मियता

‘शाहू’ पॅनलच्या पराभवाची कारणे :

  • सांगरुळ व कुडित्रे गटात न मिळालेले अपेक्षित मताधिक्य
  • पन्हाळ्यातील हवा मतपेटीपर्यंत पोहोचलीच नाही.
  • कारखाना चालवू शकतात, हा विश्वास सभासदांना देण्यात कमी पडले.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना