शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

अफवांमुळे निष्पाप फिरस्त्याचा बळी

By admin | Updated: August 25, 2015 00:06 IST

सहा दिवस मृत्यूशी झुंज : ४५० ग्रामस्थांवर खुनाचा गुन्हा

कोल्हापूर : फुलेवाडी-शिंगणापूर रस्त्यावर चोर समजून मारहाण केलेल्या फिरस्त्याचा सोमवारी सकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेले सहा दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. चोरांच्या अफवेने निष्पाप फिरस्त्याचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी करवीर पोलिसांनी ४५० हून अधिक ग्रामस्थांवर रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. फुलेवाडी-शिंगणापूर रस्त्यावर दि. १९ आॅगस्टला दुपारी चारच्या सुमारास ३५ वर्षांच्या फिरस्त्याला चोर समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत हा फिरस्ता गंभीर जखमी झाला होता. करवीर पोलिसांनी ग्रामस्थांच्या तावडीतून त्याची सुटका करून सीपीआरमध्ये दाखल केले होते. परंतु, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यास पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी तो सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता. त्याला वाचविण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. गेले सहा दिवस त्याच्या देखभालीसाठी एक कॉन्स्टेबल ठेवण्यात आला होता. परंतु, सोमवारी सकाळी त्याचा श्वास बंद पडला. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच नागरिकांसह पोलिसांनी हळहळ व्यक्त केली, तर मारहाण करणाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. फिरस्त्याचा मृतदेह तीन दिवस ओळख पटविण्यासाठी ससून रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तिकडेच त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक ढोमे यांनी सांगितले. मस्ती भोवली फुलेवाडी-शिंगणापूर परिसरात हा फिरस्ता गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फिरत होता. परिसरातील लोकांकडे जेवण मागून उदरनिर्वाह करीत होता. ही बाब अनेक नागरिकांना माहीत होती. तरीही त्यास काही हुल्लडबाज तरुणांनी अगदी ‘फिल्मी स्टाईल’ने मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शंभर जणांची नावे निष्पन्न झाली असली तरी मारहाण करणाऱ्या सुमारे २० ते २५ जणांची नावे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पोलिसांना दिली आहेत. त्यानुसार अटकेनंतर या संशयिताना पोलीस कोठडीसह कारावासात किमान तीन महिने मुक्काम करावा लागणार आहे.