कोरोनामुक्तीचा शेंडूर पॅटर्न प्रेरणादायी घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:38+5:302021-06-09T04:30:38+5:30
म्हाकवेः ग्रामस्थ, कोरोना योद्धे व तरुणांनी योगदान देत सामान्य नागरिकांच्या हितासाठी लोकसहभागातून कोरोना केअर सेंटर उभे केले. गावच्या ...

कोरोनामुक्तीचा शेंडूर पॅटर्न प्रेरणादायी घाटगे
म्हाकवेः ग्रामस्थ, कोरोना योद्धे व तरुणांनी योगदान देत सामान्य नागरिकांच्या हितासाठी लोकसहभागातून कोरोना केअर सेंटर उभे केले. गावच्या एकसंधपणातून कोरोनामुक्तीचा शेंडूर पॅटर्न इतर गावांना आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.
शेंडूर (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून लोकसहभागातून उभारलेल्या कोविड सेंटर भेटीवेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अमर कांबळे होते. यावेळी उपसरपंच अजित डोंगळे, बाबूराव शेवाळे, निखिल निंबाळकर, संदीप लाटकर, धैर्यशील इंगळे, शंकर मेथे, महादेव निंबाळकर, संदीप इंगळे, निवृत्ती निकम, गीता रणदिवे, मंदाकिनी जाधव, मुख्याध्यापक टी. व्ही. कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव उपस्थित होते.
कँप्शन
शेंडूर येथील कोविड केअर सेंटर भेटीवेळी कोरोना योद्ध्यांशी संवाद साधताना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यावेळी सरपंच अमर कांबळे, उपसरपंच अजित डोंगळे, शंकर मेथे आदी.