भाजीपाला मुबलक तरीही गर्दी : स्थानिक भाज्याही उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:39 IST2021-04-07T18:37:47+5:302021-04-07T18:39:09+5:30
CoronaVirus Kolhapur- कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली असून, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारात भाजीपाल्याची आवक मुबलक होत असल्याने नागरिकांनी गर्दी करण्याची गरज नाही. बाजार समितीत रोज सरासरी तीन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे.

भाजीपाला मुबलक तरीही गर्दी : स्थानिक भाज्याही उपलब्ध
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली असून, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारात भाजीपाल्याची आवक मुबलक होत असल्याने नागरिकांनी गर्दी करण्याची गरज नाही. बाजार समितीत रोज सरासरी तीन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदी, मिनी लॉकडाऊनसह इतर कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, यातून जीवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असले तरी भाजीपाला खरेदीसाठी सकाळी व सायंकाळी अक्षरश: झुंबड उडालेली पाहावयास मिळते. कोल्हापूर जिल्ह्यात भाज्यांची आवक चांगली आहे.
उष्मा वाढला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज तीन हजार क्विंटल भाज्यांची आवक होते. मंगळवार, गुरूवार, रविवारी तुलनेने भाज्यांची आवक कमी असते. त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपालाही सध्या बाजारात येत आहे. कोल्हापूर शहरातील मंडई, चौक, फुटपाथसह विविध ठिकाणी शेतकरी भाजीपाला घेऊन बसलेले असतात. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करण्याची गरजच नाही.