शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कोगनोळीतील सण उत्सव साजरे होणार मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 4:46 PM

navratri, belgaon, kolhapur, kognoli, virkumarpatil, minister कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील अंबाबाई देवीचा घटस्थापनेपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव, सीमोल्लंघन, बिरदेव यात्रा, दीपावली हे एकापाठोपाठ एक येणारे सर्व सण फक्त मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरे केले जातील.

ठळक मुद्देकोगनोळीतील सण उत्सव साजरे होणार मर्यादित नागरिकांनी गर्दी टाळण्याचे वीरकुमार पाटील यांचे आवाहन

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी -कोगनोळी येथील अंबाबाई देवीचा घटस्थापनेपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव, सीमोल्लंघन, बिरदेव यात्रा, दीपावली हे एकापाठोपाठ एक येणारे सर्व सण-उत्सव प्रति वर्षी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. परंतु या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे सण फक्त मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरे केले जातील.

नागरिकांना मंदिरात दर्शनाची मुभा असेल. नागरिकांनी सणांचा उत्साह ठेवावा पण गर्दी टाळावी व अंतर राखावे, असे मत माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी कोगनोळी येथे आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त केले.यावेळी स्वागत व प्रास्ताविक माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी केले. धार्मिक सणांचा उत्साह असावा परंतु सुरक्षितता बाळगणेही गरजेचे आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या आरतीनंतर तीर्थ प्रसादाचे वाटप होणार नाही. देवीच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा होईल परंतु नागरिकांनी दुरूनच दर्शन घ्यावे.

देवीच्या जागरा दिवशी पूजाविधी वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. विजयादशमीलाही मंदिरात कोणीही गर्दी करू नये. बिरदेव यात्रा काळात मेवामिठाई तसेच खेळण्याची कोणतीही दुकाने मांडली जाणार नाहीत. फक्त पूजा विधी आटोपून यात्रा संपन्न केली जाईल.

या सर्व काळात नागरिकांना दर्शनासाठी मंदिरे खुली असतील परंतु नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी न करता सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन वीरकुमार पाटील यांनी केले.यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रकाश गायकवाड, कुमार पाटील, सुरेश गुरव, बिरसू कोळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, अशोक मगदूम, आप्पासो मगदूम, डॉ.प्रवीण मगदूम, संदीप चौगुले, नामदेव दाभाडे, युवराज कोळी, बाबासो पाटील, महेश जाधव, आप्पासाहेब माने, बाळू गुरव, साताप्पा आवटे, लक्ष्मण गाडेकर, झाकिर नाईकवाडे, मुरलीधर मेस्त्री, राजगोंडा चौगुले, प्रशांत पोवाडे, संजय डूम यांच्यासह गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, मानकरी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी आभार मानले. 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक