शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: वाशीत यात्रेतील मानपानावरुन दोन गटात राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:13 IST

सडोली (खालसा) : वाशी बिरदेव वार्षिक यात्रेच्या पहिल्या दिवशी भानुस मंदिरातून मुख्य मंदिरामध्ये देव जात असताना रानगे आणि पुजारी यांच्यामध्ये ...

सडोली (खालसा) : वाशी बिरदेव वार्षिक यात्रेच्या पहिल्या दिवशी भानुस मंदिरातून मुख्य मंदिरामध्ये देव जात असताना रानगे आणि पुजारी यांच्यामध्ये मानपानावरून पालखी सोहळ्या दरम्यान बाचाबाची झाली. याचे पडसाद दगडफेकीत झाले.यामध्ये मानकरी उदयानीदेवी साळुंखे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. दोन्ही गटांनी तक्रारी दिल्याने करवीर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेचा यात्रेवर कोणताही परिणाम होणार नसून यात्रा सुरळीत पार पाडली जाईल अशी माहिती यात्रा अध्यक्ष सरपंच शिवाजी जाधव यांनी दिली आहे.वाशी ता.करवीर येथील चार राज्यातील भाविक भक्ताचे श्रध्दास्थान असलेल्या बिरदेव वार्षिक यात्रेला कालपासून सुरुवात झाली. भानुस मंदिरातून देव मुख्य मंदिरामध्ये नेऊन यात्रेला सुरुवात होते. हा पालखी सोहळा काही अंतरावर गेल्यानंतर रानगे आणि पुजारी या दोन गटातील काही मंडळींमध्ये पालखी जवळ थांबण्याचा मान व भंडारा उधळण्याचा मान घेण्यासाठी बाचाबाची झाली. दोन्ही गटात गेल्या कित्येक वर्षापासून हा वाद सुरु आहे.दरम्यान, काल पालखी सोहळा जात असताना हा वाद पुन्हा उफाळून आला त्याचे पडसाद वादाला कारण ठरले. हा प्रकार मिटवण्यासाठी गावातील प्रमुख मंडळींनी प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरल्याने या दोन्ही गटातील मंडळींनी परस्परविरोधी तक्रार दिल्याने करवीर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. यात्रेच्या पहिल्या दिवशीच वादाचा प्रकार घडल्यानं मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस