शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

बॅडमिंटन खेळून घराजवळ आला, पण 'वरुण'वर काळाने घातला घाला; मद्यपी चालकाच्या बेदरकारीने हाकनाक बळी गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 15:52 IST

अखेर त्याच्या काही मित्रांनी मनाचा निश्चय करून वरुणच्या मामांना तो दगावल्याची माहिती दिली आणि बराच वेळ धीर एकवटून थांबलेले वरुणचे आई-वडील कोसळले

कोल्हापूर : इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणारा वरुण रवी कोरडे (वय २२, रा. उदयसिंहनगरी, महावीर कॉलेजजवळ, कोल्हापूर) हा वर्गात हुशार. शिक्षकांचा आवडता आणि मित्रांचा जीवलग दोस्त. बॅडमिंटनचा खेळाडू असलेला वरुण त्याच्या उदयसिंहनगरीत प्रेमळ स्वभावाने सर्वांचा लाडका होता. बुधवारी रात्री बॅडमिंटनचा सराव करून घराकडे परतताना महावीर कॉलेजसमोर भरधाव कारने वरुणची दुचाकी उडवली आणि अवघ्या १०० मीटरवर असलेल्या त्याच्या घरी तो पोहोचू शकला नाही. या अपघाताने उदयसिंहनगरी गहिवरली.नावीन्याचा ध्यास, सळसळता उत्साह, खेळाची आवड आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला वरुण त्याच्या आई-वडिलांसाठी श्रावणबाळासारखा होता. आई शिक्षिका, वडील नोकरदार, तर मोठी बहीणही उच्चशिक्षित. घरातील उच्चशिक्षणाची परंपरा वरुण पुढे चालवत होता. शिक्षणातील हुशारीसोबतच खेळाची आवड असल्याने तो नियमित बॅडमिंटन खेळत होता. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे तो रॅकेट घेऊन मोपेडवरून घरातून बाहेर पडला. ताराबाई पार्कात बॅडमिंटनचा सराव संपवून तो घराकडे निघाला.सारे काही नेहमीप्रमाणे होते. रस्त्यात मध्येच अपघाताच्या रूपाने काळ आडवा येणार असल्याची कल्पनाही त्याला नसावी. तो काळ आला आणि वेळही आली. बावड्याकडून शहरात निघालेल्या भरधाव कारने वरुणची दुचाकी उडवली. त्याला फरफटत नेले आणि अवघ्या काही सेकंदांत तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. दुर्दैव म्हणजे अपघाताच्या ठिकाणापासून त्याचे घर अवघे १०० मीटरवर आहे.नेहमीच्या वेळेत मुलगा घरी परतला नसल्याने त्याची आई अस्वस्थ होती. तेवढ्यात शेजारचे काही तरुण घरात पोहोचले. वरुणचा अपघात झाल्याचे ऐकताच कोरडे दाम्पत्याचे हातपाय गळाले. घाबरलेल्या नजरेने दोघे सीपीआरमध्ये पोहोचले. मुलगा जखमी असेल तर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती; पण तो कुठेच दिसत नाही..पोलिस काही सांगत नाहीत..त्याच्या मित्रांना शब्द फुटत नाहीत. तुमचा मुलगा आता या जगात राहिला नाही, असे सांगण्याचे धाडस कोणातच नव्हते. अखेर त्याच्या काही मित्रांनी मनाचा निश्चय करून वरुणच्या मामांना तो दगावल्याची माहिती दिली आणि बराच वेळ धीर एकवटून थांबलेले वरुणचे आई-वडील कोसळले.

तरुणांचा पुढाकारअपघात घडल्यानंतर वरुणची ओळख पटवण्यापासून ते त्याच्या आई-वडिलांना धीर देण्यापर्यंत महत्त्वाची जबाबदारी महावीर कॉलेज परिसरातील तरुणांनी पार पाडली. मित्र गेल्याचे दु:ख लपवून वरुणच्या आई-वडिलांना सावरणाऱ्या तरुणांनी त्यांच्या परिपक्वतेचा परिचय दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू