शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे भारत'ला महिना पूर्ण, पुण्याहून कोल्हापूरला येणाऱ्या प्रवांशासाठी फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:42 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : सेमीस्पीडची आरामदायी वंदे भारत रेल्वे कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होऊन एक महिना झाला. कोल्हापूर आणि पुणे ...

संदीप आडनाईककोल्हापूर : सेमीस्पीडची आरामदायी वंदे भारत रेल्वे कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होऊन एक महिना झाला. कोल्हापूर आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून ६० टक्के प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याने ही गाडी फायद्याची ठरली आहे.आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुणांना पुण्याहून कोल्हापुरात येण्यासाठी हा गाडी आरामदायी आणि सोयीची ठरली आहे. रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार या महिन्यात या गाडीतून ३५०० प्रवाशांनी कोल्हापूर गाठले तर ३००० प्रवाशांनी पुण्यापर्यंत प्रवास केला. या गाडीला मिळालेल्या प्रतिसादामुळे आता मुंबईपर्यंत वंदे भारत सोडण्याच्या मागणीवर विचार होत आहे.कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते हुबळी मार्गावर सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी वाजतगाजत कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स येथून या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रारंभ झाला. या गाडीला केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. या रेल्वेला केवळ सातारा, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज हे थांबे आहेत. या रेल्वेची पुणे मार्गावर ताशी ९० किलोमीटर वेगाने चाचणी यशस्वी झाली असली तरी ही गाडी सध्या ६२ किलोमीटर प्रतितास वेगाने धावते आहे. ३२६ किलोमीटरचे अंतर ही गाडी ५ तास १५ मिनिटांत पूर्ण करते.कोल्हापूर-पुणे (क्रमांक २०६७३) ही गाडी दर गुरुवार, शनिवार आणि सोमवार सकाळी ८:१५ वाजता कोल्हापुरातून सुटते आणि पुण्यात १:३० वाजता पोहोचते तर पुणे-कोल्हापूर (क्रमांक २०६७४) ही गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी २:१५ वाजता सुटते आणि कोल्हापुरात सायंकाळी ७:४० वाजता पोहोचते. या गाडीपाठोपाठ सकाळी ८:२० वाजता कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातून सुटते. या दोन्ही गाड्यांमध्ये फक्त पाच मिनिटांचेच अंतर आहे. या वंदे भारतची क्षमता ५३० प्रवाशांची आहे. यातील ४७८ सीट एसी चेअर कारची आहे तर ५२ एक्झिक्युटिव्ह आहे. कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर आतापर्यंत प्रतिदिन १३० ते १६० प्रवासीच प्रवास करत असल्याची नोंद आहे. ही टक्केवारी ३० टक्केच आहे. शनिवारी कोल्हापुरातून धावलेल्या वंदेभारत गाडीतील प्रवाशांची संख्या १५३ होती. तर पुण्यातून येणाऱ्या गाडीत १४४ प्रवाशांनी प्रवास केला. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्येही २५ सीट बुक होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसPuneपुणे