शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

धामणी प्रकल्पाची किंमत ७८० कोटींवर

By admin | Updated: July 13, 2014 00:47 IST

खर्चाचा हिशेब जाहीर करावा : निधीअभावी प्रकल्प रखडल्याचे कारण तकलादू; वाढीव खर्चच कारणीभूत

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरभरमसाट वाढलेली प्रकल्पाची किंमत हीच धामणी प्रकल्पास आता निधी मिळण्यात सर्वांत मोठी व महत्त्वाची अडचण ठरली आहे. ज्या रकमेत प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता तेवढी रक्कम यापूर्वीच खर्च होऊनही अजूनही त्याहून दुप्पट रक्कम प्रकल्पासाठी लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे सुधारित प्रशासकीय अंदाजपत्रक आहे. त्यामुळे हे अंदाजपत्रक नाशिकच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे छाननीसाठी देण्यात आले आहे. त्यांनी त्यावर मारलेले शेरे पूर्तता न करता आल्याने राज्य सरकारकडून निधी मिळण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत खर्च झालेल्या निधीचा घटकनिहाय हिशेब पाटबंधारे खात्याने जाहीर करण्याची मागणी होत आहे.कोल्हापूर पाटबंधारे मंडळातील मध्यम प्रकल्प विभागाचे अधिकारी उर्वरित कामासाठी अजून २६८ कोटी रुपये लागतील असे सांगत आहेत. या निधीची तरतूद २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात होईल व हा निधी उपलब्ध झाल्यानंतर किमान दीड वर्षे प्रकल्प पूर्ण होण्यास लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, प्रकल्पाचे सुधारित अंदाजपत्रक ७८० कोटींचे असल्याचे या विभागाशी संबंधित अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. या धरणाला यापूर्वीच सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता तिसऱ्यांदा ती मूळ किमतीपेक्षा सहापट जास्त होत आहे. कोणत्याही प्रकल्पाची दरसूची वर्षाला वाढत जाते, त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढणार हे गृहीतच आहे. त्यात काही गैर नाही; परंतु राज्य शासनाच्या नियमानुसार वर्षाला दरसूचीतील वाढ सहा टक्के मान्य करण्यात येते. त्यानुसार हिशेब केल्यास प्रकल्प किंमत ३०० कोटीपर्यंत जाते. मग सुधारित प्रस्ताव ७८० कोटी रुपयांचा कसा, असा आक्षेप तांत्रिक समितीनेच घेतला आहे. धरणाच्या संकल्पचित्रात फारसा बदल नाही. व्याप्तीतही बदल नाही आणि मग फक्त दरसूचीत वाढ झाल्यामुळे प्रकल्पाची किंमत इतकी कशी काय वाढली, हे एक भ्रष्टाचाराचे कोडे आहे.प्रकल्प का रखडला म्हणून विचारल्यावर शासन निधी देत नाही म्हणून असे पाटबंधारे खात्याचे अधिकारी व लोकप्रतिनिधीही सांगून जबाबदारी झटकून मोकळे होतात. परंतु, हा निधी शासन का देत नाही, कारण या प्रकल्पावर आतापर्यंतच वारेमाप निधी खर्च झाला असतानाही प्रकल्प अपुरा राहिला असेल, तर मग त्या निधीचे काय झाले? याचे उत्तरही पाटबंधारे खात्याने जाहीरपणे दिले पाहिजे. धामणी परिसरातील एक शेतकरी याबाबत म्हणाला की, जेवढा निधी आतापर्यंत खर्च झाला, त्याची पोती भरून थप्पी लावली असती तरी एक-दोन टीएमसी पाणी आपोआप साठले असते. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरी वास्तव त्याला सांधणारेच आहे, हेदेखील नाकारता येत नाही.