डाळिंबाच्या बागेत उषातार्इंचा ट्रॅक्टर

By Admin | Updated: March 7, 2017 23:01 IST2017-03-07T23:01:07+5:302017-03-07T23:01:07+5:30

ढवळ : शेतीच्या मशागतीचीही अवजड कामेही करताना पुढाकार

Ushatarik tractor in pomegranate garden | डाळिंबाच्या बागेत उषातार्इंचा ट्रॅक्टर

डाळिंबाच्या बागेत उषातार्इंचा ट्रॅक्टर

लखन नाळे -- वाठार निंबाळकर  -चार हजार लोकसंख्येच्या गावचा गाडा चालवितानाच उत्तम पद्धतीची डाळिंब पिकाची शेती करणाऱ्या उषाताई आप्पासो लोखंडे नुसत्या ढवळ गावातच नव्हे तर फलटण तालुक्यात इतर महिलांपुढे आदर्श ठरत आहेत.
ढवळ, ता. फलटण गावच्या सरपंच उषाताई लोखंडे या ढवळ या चार हजार लोकसंख्येच्या गावचा गावगाडा उत्तमपणे हातळत असून, गावातील सार्वजनिक व वैयक्तिक कामांमध्ये सक्रिय सहभागी असतात.
गावच्या कामकाजाबरोबरच घरातील दोन मुले, नोकरदार पती, वृद्ध सासूबाई आदींची कौटुंबिक जबाबदारीही त्या उत्तमपणे सांभाळत आहेत.
थोरा-मोठ्यांच्या सरपंच आन्टी या फक्त ‘चूल आणि मूल’ यामध्ये न अडकता पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक व राजकीय जीवन जगत असून, डॅशिंग व धडाडीच्या आन्टी गावात अन्याय, अत्याचार कधीही होऊ देत नाहीत.
ही झाली एक बाजू, त्यांच्या स्वत:च्या कुटुंबासाठी काम करताना त्या खरोखरच आदर्श ठरत असून, सर्व प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहन चालवितानाच शेतात ट्रॅक्टरने नांगरट व इतर शेतीची मशागत त्या स्वत: ट्रॅक्टर चालवून करताना पाहताना पुरुषांनाही लाज वाटेल, अशा पद्धतीचे काम शेतात करीत असतात.
तीन वर्षांपूर्वी शेततळे तयार करून त्यामध्ये पाणी साठवणूक केली व ढवळच्या माळावर आन्टी यांनी सहा एकर डाळिंबाची लागवड कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली.
स्वत: घेत असलेले कष्ट व करीत असलेल्या मेहनतीच्या जोरावर आज त्यांनी डाळिंब पीक उत्तम पद्धतीने आणले असून, डाळिंब पिकावर वेळच्या वेळी औषध फवारणी, पाणी, खते पिकाला देऊन डाळिंब पीक मोठ्या जोमात डोलायला लावले आहे.


या शेती व्यवसायाबरोबरच गायी सांभाळून दुग्ध व्यवसाय व दूध शीतकरण केंद्र ही त्या उत्तम पद्धतीने चालवित आहेत.
त्यांचे पती आप्पासाहेब हे माध्यमिक विद्यालयात कर्मचारी म्हणून काम करत असून, पतीच्या मदतीशिवाय शेती व्यवसाय व राजकारण उत्तम पद्धतीने ढवळ गाव फलटण तालुक्यातील महिलांपुढे वेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम सरपंच उषाताई लोखंडे यांनी केले आहे.

Web Title: Ushatarik tractor in pomegranate garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.