शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात यंदा होणार ‘सगुणा’ भातपिकाचा प्रयोग

By admin | Updated: May 28, 2015 01:12 IST

तालुक्यातील २० शेतकऱ्यांना प्रशिक्षण : कमी श्रमात, कमी खर्चात भाताचे अधिक उत्पादन घेता येणार

ज्योतीप्रसाद सावंत - आजराआजरा तालुक्यामध्ये भातशेती क्षेत्रात विविध प्रयोग केले जाऊ लागले असून, उत्पादन खर्चात बचत करणाऱ्या सगुणा भात उत्पादन तंत्राचा वापर यावर्षी केला जणार असून, खरीप हंगामात होणाऱ्या या प्रयोगासाठी तालुक्यातील २० शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तालुका कृषी विभागाच्या पुढाकाराने हे शेतकरी नेरळ (ता. रायगड) येथील सगुणा भात शेतीतंत्राला भेट देण्यासाठी सज्ज झाले आहेत.याबाबत बोलताना तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम म्हणाले, हा प्रयोग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याअंतर्गत राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १२० हेक्टरवर, तर आजरा तालुक्यात १५ हेक्टरवर हा प्रयोग केला जाणार आहे. सगुणा भात शेतीतंत्र हे काही वर्षांत नेरळमधील सगुणा बागेतील काही शेतकऱ्यांनी विकसित केले आहे. कमी श्रमात, कमी खर्चात भाताचे अधिक उत्पादन घेता येते. यामुळे उत्पादकाला खर्चात बचत होते.या तंत्राद्वारे शेतामध्ये नांगरणी करून एक मीटर रुंदीचे गादी वाफे तयार केले जातात. वाफसा आल्यावर लोखंडी मार्करद्वारे खुणा करून प्रत्येक खुणेवर एक किंवा दोन बियांची टोकणणी करावी. दुसऱ्या दिवशी वाफ्यावर तणनाशकाची फवारणी करावी. यामुळे भांगलणीचा खर्च कमी होतो. चार रोपांमध्ये एका युरिया ब्रिकेटची टोकणी करावी. हे तंत्र धूळवाफ पेरणीसारखे आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने पेरणी असल्याने पिकाच्या उत्पादनात भरपूर वाढ होते. गादी वाफ्यांवरील भात कापणीनंतर कडधान्याची पिके घेता येतात. नांगरणीची तीन वर्षे गरज नाही, असेही निकम यांनी स्पष्ट केले.पी. पी. चा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग राहणार आहे. शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग घेऊन संशोधन केलेल्या तंत्राचा अवलंब करून कमी खर्चात पीक घेतले जाणार आहे. यामध्ये शेतकरी कंपनीबरोबर शासनाचा सहभाग राहणार आहे.या प्रकारामध्ये भाजावळ व राब लावणे हे बंद होणार आहे. याचबरोबर चिखलणीही गरजेची राहणार आहे.