फळे, भाजीपाल्यांचा रोजच्या आहारात वापर करा; निसर्गमित्र परिवाराची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:23+5:302021-01-08T05:16:23+5:30
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संकल्पनेचे परिवाराकडून स्वागत करण्यात आले असून, निरोगी जीवनशैलीसाठी विस्मरणात गेलेली फळे व भाज्यांचे गुणधर्म लक्षात ...

फळे, भाजीपाल्यांचा रोजच्या आहारात वापर करा; निसर्गमित्र परिवाराची मोहीम
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संकल्पनेचे परिवाराकडून स्वागत करण्यात आले असून, निरोगी जीवनशैलीसाठी विस्मरणात गेलेली फळे व भाज्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन त्यांचा आपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी निसर्गमित्र परिवाराकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी निसर्गमित्र परिवाराशी २८२३/४८, बी वार्ड, महालक्ष्मी नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर आणि कार्यवाह अनिल चौगुले यांनी केले आहे.
असे आहेत उपक्रम
शहरी शेती या नवसंकल्पनेला अनुसरून अंगण, टेरेस, बाल्कनी अशा उपलब्ध जागेत उपयुक्त वनस्पती लागवडीसाठी कार्यशाळा व मार्गदर्शन, प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी फळ व भाजीपाल्याच्या शेतावर शिवार भेट, स्थानिक फळे व भाजीपाला यांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन करणे, तसेच रोजच्या आहारात हंगामानुसार फळे, कच्च्या भाज्या, सॅलड यांचा वापर करणे, कोणत्याही कार्यक्रमात, समारंभात फुलांचा गुच्छ देण्याऐवजी फळझाडांचे रोप भेट देणे, विविध रानफळे, रानभाज्यांचे महोेत्सव घेणे व प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणे, पारंपरिक शेती पद्धतीत नवीन सुधारणा करण्यासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापन व पीक पोषण, संरक्षण, गुणवत्ता, यावर चर्चासत्र घेणे व शेती तसेच जैवविविधतेचे महत्त्व यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करणे, सौरऊर्जा वाळवणी यंत्राच्या साहाय्याने नाशवंत फळे, भाजीपाला यावर प्रक्रिया करून उपपदार्थ करणे, ते टिकविण्यासाठी कार्यशाळा घेणे, औषधी फळे व भाजीपाला, वनस्पतींच्या राेपवाटिका प्रशिक्षण कार्यशाळा आयाेजित करणे असे उपक्रम घेण्यात येणार आहेत.
(संदीप आडनाईक)