शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’साठी १४ पर्यंत मुदत

By admin | Updated: November 7, 2014 00:08 IST

आंदोलनाचा इशारा : साखर कारखाना सुरू करण्यासाठी पाटणे फाटा येथील बैठकीत निर्णय

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाला १४ नोव्हेंबर २0१४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. कारखाना चालू करावा, यासाठी हितचिंतकांची पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी डॉ. बी. एल. पाटील अध्यक्षस्थानी होते.सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दौलत कारखाना गेले तीन हंगाम बंद अवस्थेत आहे. मात्र, संचालक मंडळाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. विश्वस्त या नात्याने त्यांची जबाबदारी असून, त्यांच्याकडून मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही. याबाबत चर्चा करून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील जनतेतून उठाव करण्यासाठी तालुक्यातील हितचिंतकांची बैठक झाली. यावेळी एस. एम. कोले म्हणाले, या निवडणुकीत कारखाना चालू करण्याचे आश्वासन देत मते मागितली होती. मात्र, पराभव झाल्याने दोघेही लोकांसमोर येत नाहीत. लोकांची केवळ दिशाभूल करून त्यावर राजकारण केले जात आहे. जनतेला सर्वकाही माहीत असल्याने यापुढे या दोघांनाही उत्तर द्यावे लागेल. अ‍ॅड. संतोष मळवीकर म्हणाले, संचालक मंडळ कुचकामी असून, त्यांनी कारखाना सुरू करावा, अन्यथा खुर्च्या खाली करा. रोजच्या तारखांना लोक कंटाळले आहेत. लोकांची दिशाभूल करून फार दिवस जात नाहीत. यापुढे कारखाना सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्वानुमते ‘दौलत बचाव’ समितीची स्थापन करण्यात आली. यामध्ये डॉ. बी. एल. पाटील, एन. एस. पाटील, संतोष मळवीकर, प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, कृष्णा रेगडे, एस. एम. कोले, गणेश चिटणीस, अपय्या नाईक, रवींद्र पाटील, चंद्रशेखर गावडे, गुंडोपंत सावंत, वैजनाथ कुट्रे, केदारी पाटील, विष्णू गावडे, वैजनाथ हुसेनकर, सुहास पाटील, प्रशांत कदम, नारायण धामणेकर, जयवंत बागवे, महनसेठ स्वामी, भागोजी कागणकर, बापू शिरगावकर, रूपेश अनगुडे, कृष्णा चव्हाण, सुनील नाडगौडा, आप्पाजी जाधव यांचा समावेश असून, या २५ व्यक्तिंना सर्वाधिकार देण्यात आले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते. ए. जे. देसाई यांनी आभार मानले. संचालक मंडळाविरोधात आंदोलनकारखाना १४ नोव्हेंबरपर्यंत सुरू न झाल्यास १५ नोव्हेंबरला ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील व संचालकांनी तालुक्याचे तहसीलदार यांच्यासमोर कारखाना सुरू करण्याबाबत कारणे द्यावीत. त्यानंतर १७ नोव्हेंबरपासून संचालक मंडळाच्या विरोधात हलकर्णी फाट्यावर ठिय्या आंदोलन करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.