शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या बेजबाबदारीमुळे वृद्धाचा हकनाक मृत्यू अपघातानंतर रुग्णालयात न नेता रस्त्यावर दिले सोडून : माणुसकीला काळिमा फासणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 01:27 IST

शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्याच खिशातील पैसे घेऊन अज्ञात तरुणाने पोबारा केला.

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्याच खिशातील पैसे घेऊन अज्ञात तरुणाने पोबारा केला.दरम्यान, वेळेत उपचार न मिळाल्याने वृद्धाचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्देवी मृत्यू झाला. शंकरराव रामचंद्र मोरे (वय ७७, रा. धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. अज्ञात तरुणाचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे असून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संशयित तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा जुना राजवाडा पोलीस शोध घेत आहेत.अधिक माहिती अशी, शंकरराव मोरे हे टिंबर मार्केट येथे सुतारकाम करीत होते. नेहमीप्रमाणे ते १० जुलै रोजी कामावरून दुपारी साडेबाराच्या सुमारास चालत घरी जात होते. शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये एका अज्ञात मोटारसायकलने त्यांना मागून जोराची धडक दिली. त्यामध्ये मोरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध पडले. संबंधित तरुणाने त्यांना उचलून एका रिक्षामध्ये घातले. यावेळी याठिकाणी जमा झालेल्या लोकांना आजोबांना रुग्णालयात घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेला. मोरे यांना रुग्णालयात न नेता तो रंकाळ्याजवळील जावळाच्या गणपतीच्या येथील एका बंद दुकानाजवळ घेऊन आला. आपल्या सहकाºयाच्या मदतीने मोरे यांना रिक्षातून खाली उचलून रस्त्यावर ठेवले. त्यांच्या खिशातील ओळखपत्र व काही रक्कम त्याने काढून घेतली. हा प्रसंग पाहणाºया लोकांनी त्या तरुणाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले हे मामा रस्त्यात चक्कर येऊन पडले होते. त्यांचे ओळखपत्र मिळाले आहे. त्यांना याठिकाणी बसवून मी त्यांच्या घरातील लोकांना बोलवून आणतो, असे सांगून तो आपल्या सहकाºयाच्या दुचाकीवरून निघून गेला. मोरे रस्त्यावरच बेशुद्धावस्थेत दुपारी १ पासून ४ वाजेपर्यंत पडून होते. येथील काही लोकांनी त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून (१०८) सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सुमारे चार तास जखमी व बेशुद्धावस्थेत पडून राहिल्याने तसेच वेळेत उपचार न झाल्याने ते कोम्यात गेले. शेवटी १६ जुलैला त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रंकाळ्याजवळील एका दुकानासमोर मोरे यांना सोडून जाणारा तरुण, त्यांच्या खिशातील पैसे घेऊन जाताना, सर्व प्रसंग येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. मोरे यांचा मुलगा प्रताप मोरे यांनी हे चित्रीकरण मिळवले असता त्यांना धक्काच बसला. संशयित २६ वर्षांचा तरुण, निळा शर्ट, जिन्सची पॅन्ट घालून आहे. त्याच्या हलगर्जीपणामुळे वडिलांचा हकनाक बळी गेला. त्यांनी त्या तरुणाच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दुचाकीचा नंबर अस्पष्ट आहे; त्यामुळे अद्यापही तो मिळून आलेला नाही. या घटनेचे वृत्त वॉटसअ‍ॅप, फेसबुकवरून प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांतून संशयित तरुणाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. नराधम तरुण कोणाला दिसून आल्यास, त्याला कोणी ओळखत असल्यास जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी केले आहे.कोल्हापूरच्या परंपरेला छेदरात्री-अपरात्री कुणाच्याही मदतीला धावून जाणे ही कोल्हापूरची संस्कृती आहे. या शहरात कुणी बाहेरगावच्या प्रवाशाने नुसता पत्ता विचारला तरी त्याला त्याच्या घरापर्यंत नेऊन सोडणारे लोक आहेत. अशा शहरात, दवाखान्यात दाखल करतो, असे सांगून जखमीला दुकानाच्या कठड्यावर बसवून जाणाºया त्या तरुणाबद्दल लोकांतून संताप व्यक्त होत आहे. असे यापूर्वी या शहरात कधीच घडले नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली.या अपघाताप्रकरणी पोलिसांत संशयित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. आम्ही त्याचा कसून शोध घेत आहोत. लवकरच त्याला अटक करू.- मानसिंह खोचे, पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा पोलीस ठाणे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा