कर्नाटकच्या बसगाड्यांवर संयुक्त महाराष्ट्राचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:48+5:302021-02-05T07:06:48+5:30

गडहिंग्लज : बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणारच, अशा आशयाचे फलक कर्नाटकच्या बसगाड्यांवर लावून येथील जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार ...

United Maharashtra plaques on buses in Karnataka | कर्नाटकच्या बसगाड्यांवर संयुक्त महाराष्ट्राचे फलक

कर्नाटकच्या बसगाड्यांवर संयुक्त महाराष्ट्राचे फलक

गडहिंग्लज : बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणारच, अशा आशयाचे फलक कर्नाटकच्या बसगाड्यांवर लावून येथील जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील काही ठिकाणी महाराष्ट्राच्या बसगाड्यांवर ‘गडहिंग्लज कर्नाटक’चे अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. त्याला उत्तर म्हणून जनता दलातर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले.

नगरपालिकेपासून दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत फेरी काढून गडहिंग्लज बसस्थानकात आलेल्या कर्नाटकच्या बसगाड्यांवर संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे फलक लावण्यात आले. उपनगराध्यक्ष महेश कोरी म्हणाले, जाती-धर्मात द्वेष पसरविणारे भाजपा सरकार आता कन्नड-मराठी भाषिकांमध्ये भांडण लावत आहे. विविधतेला, एकतेला छेद देणारी ही प्रवृत्ती निषेधार्ह आहे.

आंदोलनात माजी आमदार श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, सुनीता पाटील, क्रांती शिवणे, शकुंतला हातरोटे, लता पालकर, सागर पाटील, शीतल देवार्डे, सुनील कलाल, गुरुप्रसाद नूलकर, अमर शेटके, इम्रान मुल्ला, अमजद मीरा, संदीप पाटील, अवधूत केसरकर, विनोद लाखे, सूरज गवळी, शुभम चव्हाण, जाफर तपकिरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

-----------------------------------------------------

फोटो ओळी :

गडहिंग्लज येथे जनता दलातर्फे कर्नाटक बसगाड्यांवर संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे फलक लावून निदर्शने करण्यात आली. यावेळी श्रीपतराव शिंदे, महेश कोरी, स्वाती कोरी, नरेंद्र भद्रापूर, विनोद लाखे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रमांक : ०१०२२०२१-गड-०८

Web Title: United Maharashtra plaques on buses in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.