शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विषयच हार्ड! कोल्हापूरच्या तरुणाने प्रपोजसाठी लावला हायवेवर डिजिटल बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 20:31 IST

या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला

सुरज पाटीलहेरले : विवाह म्हटलं की मुलीला बघायला जाणे, कांदे-पोह्याचा कार्यक्रम, मुलगी पसंत पडली तर पुढील रितीरिवाजाप्रमाणे बोलणी यासर्व पारंपारिक गोष्टी आल्याच. मात्र सध्याच्या आधुनिक जगात आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमवीर अनेक नामी शक्कल लढवत असतात. अशीच काहीशी आगळी-वेगळी शक्कल कोल्हापुरातील एका तरुणाने लढवली आहे. या तरुणाने एका मुलीला लग्नासाठीच प्रपोज केलाय अन् तो जिल्ह्यात तसेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.कोल्हापुरातील इंजिनीयर असणाऱ्या तरुणाने लग्नासाठी मुलीला चक्क डिजिटल होर्डिंग द्वारेच प्रपोज केला आहे. सौरभ कसबेकर असे या तरुणाचे नाव आहे. सौरभने कोल्हापूर-सांगली महामार्गावर चोकाक येथे होर्डिंग वर 'उत्कर्षा मॅरी मी - सौरभ' एवढेच लिहून अनोख्या पद्धतीने प्रपोज केलं. या होर्डिंगची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे.घरचे म्हणाले कोणी असेल तर सांगसौरभ कसबेकर आणि सांगलीमधील मुलगी उत्कर्षा दोघेही बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. शिक्षण पुर्ण होताच घरच्यांनी सौरभकडं लग्नाबाबत विचारणी केली. घरचे म्हणाले कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असे म्हणताच त्याने तात्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असे सांगितले. घरच्यांनी रीतसर तिच्या घरी लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. त्यानुसार सौरभच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी मागणी घातली...अखेर उत्कर्षाकडून होकारउत्कर्षाच्या घरच्यांचे सुद्धा काही दिवस होय नाही होय नाही हेच सुरू होते. उत्कर्षाकडून सुद्धा अध्याप होकार आला नव्हता. अनेक प्रयत्नानंतर अखेर घरचे सुद्धा तयार झाले. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने तिला प्रपोज करायचे असे सौरभने ठरवले होते. त्यानुसार त्याने कोल्हापूर-सांगली रोड वर एका होर्डिंगद्वारे प्रपोज करायचे ठरवले. कोल्हापूर-सांगली महामार्गावर चोकाक येथे होर्डिंग वर 'उत्कर्षा मॅरी मी - सौरभ' एवढेच लिहून त्याने अनोख्या पद्धतीने प्रपोज केले.अनोख्या लव्ह स्टोरीची जिल्ह्यात चर्चाया अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.२७ मे रोजी लग्न - दरम्यान, दोघांच्याही घरचे तयार झाले आहेत. शिवाय येत्या २७ मे रोजी दोघांचे लग्न सुद्धा ठरवले आहे. त्यामुळे आम्ही दोघेही आनंदी असून आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रपोज करून लग्न होत असल्याचा शिवाय कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात याची चर्चा सुरू असल्याचाही आनंद होत असल्याचे दोघांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नhighwayमहामार्गdigitalडिजिटल