शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

पणती पेटणार, कमळ फुलणार, सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे अनोखे फंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 1:40 PM

दारामध्ये लावलेल्या पणतीतून कमळ फुलण्यापासून ते मोदींच्या पोस्टरसमोर सेल्फी काढण्यापर्यंत, भाजपला पाच रुपयांची मनिआॅर्डर करण्यापासून ते घरावर भाजपचे झेंडे लावण्यापर्यंतचे अनोखे फंडे राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

ठळक मुद्देपणती पेटणार, कमळ फुलणारसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे अनोखे फंडे

कळंबा/कोल्हापूर : दारामध्ये लावलेल्या पणतीतून कमळ फुलण्यापासून ते मोदींच्या पोस्टरसमोर सेल्फी काढण्यापर्यंत, भाजपला पाच रुपयांची मनिआॅर्डर करण्यापासून ते घरावर भाजपचे झेंडे लावण्यापर्यंतचे अनोखे फंडे राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.लोकसभेच्या तोंडावर जिल्हा पातळीवर सर्व शक्तिप्रमुखांच्या बैठका घेण्याचे सत्र भाजपने सुरू केले असून, असाच एक मेळावा शुक्रवारी दुपारी कळंबा (ता. करवीर) येथे पार पडला. या ठिकाणी या सर्व अनोख्या योजनांबाबत कार्यक र्त्यांना माहिती देण्यात आली.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा समर्पण दिन म्हणून ११ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सकाळी १० वाजता ‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतचा निधी भाजपला आॅनलाईन पाठवायचा आहे. ‘आम्ही केवळ व्होट देणार नाही; तर पक्षासाठी नोटही देऊ,’ अशी भावना यातून प्रबळ करण्यात येणार आहे.दुसऱ्याच दिवशी १२ फेब्रुवारीला ‘माझा परिवार, भाजपा परिवार’ या अभियानांतर्गत घरावर भाजपचे झेंडे लावण्यात येणार आहेत. याच दिवशी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या परिवाराने पक्षाकडून पुरविण्यात आलेल्या पोस्टरसमोर उभे राहून फोटो काढून तो आॅनलाईन पाठवायचा आहे.तसेच २६ फेब्रुवारीला मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून, खेड्यामध्ये ६० किलोमीटर आणि शहरामध्ये ५० किलोमीटर रॅली काढली जाईल. याच दिवशी संध्याकाळी ‘कमळज्योती’ उपक्रमांतर्गत भाजपला मानणाऱ्या घरांसमोर पणती प्रज्वलित करण्यात येणार आहे. ही पणती पेटली की तिच्यातून कमळ फुलणार आहे. पक्षाकडूनच या पणत्या पुरविण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून सर्वसामान्यांशी असलेले भाजपचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी भाजपने या अनोख्या उपक्रमांचे आयोजन केले आहे.कळंबा येथे झालेल्या या मेळाव्यामध्ये भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, शिवाजी बुवा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य के. एस. चौगुले, डॉ. अजय चौगुले, विजया पाटील, अशोक चराटी, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, अनिता चौगुले, मनीषा टोणपे, अनिल यादव, गोपाळराव पाटील यांच्यासह भाजपचे नगराध्यक्ष आणि मोठ्या संख्येने शक्तिप्रमुख उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर