शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कोल्हापुरात गडकरी, राऊत, कोल्हेंसह बच्चू कडूंची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री शिंदे यांची रविवारी रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 12:31 IST

महायुती, महाविकास आघाडीकडून जोडण्यांना वेग

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस राहिले असून, प्रचार यंत्रणेने वेग घेतला आहे. सभांचा धडाका सुरू असून, उर्वरित काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार संजय राऊत, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू यांच्या ताेफा ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघांत धडाडणार आहेत. शिंदेसेनेच्या वतीने रविवारी (दि. ५) काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

‘काेल्हापूर’ मतदारसंघात महायुतीचे संजय मंडलिक व महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती यांच्यात सरळ लढत होत आहे. तर ‘हातकणंगले’ मतदारसंघात महायुतीचे धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरूडकर, ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी व ‘वंचित’चे डी. सी. पाटील यांच्यात सामना होत आहे. गेले पंधरा-वीस दिवस प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे, रोहित पवार, बाळासाहेब थोरात आदींच्या सभा झाल्या आहेत.

जाहीर प्रचाराची सांगता रविवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता होत आहे. त्यामुळे तीन दिवसांत प्रचाराचा अक्षरश: धुरळा उडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी संजय मंडलिक यांच्यासाठी महासैनिक दरबार येथे व्यापारी, उद्योजक यांच्यासमवेत सभा आहे. शुक्रवारी खासदार अमोल कोल्हे हे शाहू छत्रपती यांच्यासाठी कोल्हापुरात असून, ते कागल व कसबा बावड्यात सभा घेणार आहेत. त्याचबरोबर ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू हे राजू शेट्टी यांच्यासाठी शिराळ्यात सभा घेणार आहे. त्याशिवाय खासदार संजय राऊत, आदेश बांदेकर, जॅकी श्राॅफ आदींच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.रविवारी पदयात्रांवरच भर‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’साठी मंगळवारी (दि. ७) मतदान होत आहे. त्यासाठी जाहीर प्रचाराची सांगता रविवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता होत आहे. या दिवशी कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर या प्रमुख शहरांसह मतदारसंघातील मोठ्या गावांतून पदयात्रा, दुचाकी रॅली काढण्याचे नियोजन महाविकास आघाडी व महायुतीचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीSanjay Rautसंजय राऊतDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेBacchu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदे