शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2026: वस्त्रोद्योग धोरणामुळे आधुनिकीकरणाला चालना, टेक्स्टाईल पार्कमुळे ग्रामीण भागाला रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:49 IST

इचलकरंजी शहराबरोबरच राज्यामध्ये सुमारे १२ हजार यंत्रमाग

अरुण काशीदइचलकरंजी : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणामुळे विकेंद्रीकरण क्षेत्रातील यंत्रमाग उद्योजकांना आपल्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण करण्याची संधी मिळणार आहे. तर मेगा टेक्स्टाईल पार्कमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आधुनिकीकरण आणि रोजगार या दोन्हींचा उहापोह वस्त्रोद्योग धोरणात केल्यामुळे उद्योजकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.केंद्रीय अर्थमंत्र्यांनी रविवारी (दि. १) व्यापक वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले. ५ कलमी धोरण जाहीर करताना त्यांनी यंत्रमागाच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन दिले. इचलकरंजी शहराबरोबरच राज्यामध्ये सुमारे १२ हजार यंत्रमाग आहेत. बहुतांश यंत्रमाग हे विकेंद्रीकरण क्षेत्रात आहेत. वर्षानुवर्षे यंत्रमागधारक आपला व्यवसाय करीत आहेत. यंत्रमागाचे आधुनिकीकरण करण्याची आस उद्योजकांच्या मनात असली तरी भांडवलाअभावी त्यांना ते शक्य झालेले नाही.नवीन वस्त्रोद्योग धोरणामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी १० हजार कोटींची तरतूद केल्यामुळे जे लहान उद्योग आहेत, त्यांच्या आधुनिकीकरणाला चालना मिळणार आहे. जर शासनाकडून हातभार लागला, तर बदलत्या काळानुसार यंत्रमाग उद्योजक पुढचे पाऊल टाकू शकतील. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत निधीसाठी अतिरिक्त २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जे नवउद्योजक आहेत, यंत्रमाग उद्योगामध्ये येऊ इच्छितात, त्यांना उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. यातून अनेक नवउद्योजक घडणार आहेत.त्याचबरोबर हातमाग आणि हस्तकला उद्योगालाही प्रोत्साहन दिल्यामुळे ग्रामीण भागामध्ये साडी व धोतर तयार करणारे उद्योजक आहेत, त्यांना चांगला व्यवसाय उभारता येणार आहे.मोठे शहर आणि खेडी यांच्यामध्ये दुवा असणाऱ्या लहान शहरालगत मेगा टेक्स्टाइल पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यापूर्वीही मेगा टेक्स्टाइल पार्कची घोषणा झाली होती. मात्र, हा पार्क फारसा पुढे सरकला नाही. या वर्षभरात त्याला गती मिळण्याची आशा आहे.

शहरांनी घ्यावा फायदाभिवंडी, पाली-बालोत्रा, मालेगाव, बृहाणपूर, इचलकरंजी, सोलापूर, बेळगाव, खानापूर, पैठण, माधवनगर अशा शहरांतील उद्योजकांनी वस्त्रोद्योग धोरणाचा फायदा करून घेऊन आपला उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जरी घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली असली तरी प्रत्यक्ष उद्योग वाढीसाठी सरकारने जी आखणी केली आहे, ते एप्रिलमध्ये अधिक स्पष्ट समजेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Union Budget 2026: Textile policy boosts modernization, rural jobs.

Web Summary : Textile policy offers modernization for power loom sector, creates rural jobs via textile parks. ₹10,000 crore for MSMEs will boost upgrades. New entrepreneurs get ₹2,000 crore support. Cities should leverage this policy.