दुर्दैवी! पावसाच्या पाण्यात महिला गेली वाहून

By विश्वास पाटील | Updated: October 14, 2022 22:49 IST2022-10-14T22:48:23+5:302022-10-14T22:49:57+5:30

शुक्रवारी सायंकाळी घडला हा प्रकार

Unfortunate! The woman was carried away by the rainwater | दुर्दैवी! पावसाच्या पाण्यात महिला गेली वाहून

दुर्दैवी! पावसाच्या पाण्यात महिला गेली वाहून

कोल्हापूर: जिल्ह्यातील मोजे नरंदे, (तालुका हातकणंगले) शुक्रवारी, सायंकाळी ७.३० वाजता गिड्डे मळा येथे मजुरीसाठी गेलेल्या मजुर महिला व पुरुष असे चोघे जण अचानक ओढ्यामध्ये आलेल्या पाण्यामध्ये वाहून गेले पण त्यातील तिघांना वाचवण्यात यश आले..एक महिला मात्र वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. अन्य चौघे झाडाच्या मदतीने वाचले आहेत. वाहून गेलेल्या महिलेचे नाव आनंदी गणेश राजमाने (वय ३९, रा. दानोळी तालुका शिरोळ) असे आहे.

वाचलेल्या व्यक्तींमध्ये रमेश अण्णासाहेब सांगोले, सदाशिव नंदू थोरात, दादासो गुरुजी क्षीरसागर, लक्ष्मीबाई कोळी हे सर्वजण राहणार दानोळी (तालुका शिरोळ)चे आहेत. गावातील तरुणाचे सध्या शोध कार्य सुरू आहे. पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे.

Web Title: Unfortunate! The woman was carried away by the rainwater