शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार तरुणांनी माझा व्यवसाय, माझा हक्क योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST

कागल लहान- मोठ्या उद्योगधंद्यासाठी अनुदान आणि कर्ज मिळवून देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती हा कार्यक्रम सुरू ...

कागल

लहान- मोठ्या उद्योगधंद्यासाठी अनुदान आणि कर्ज मिळवून देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती हा कार्यक्रम सुरू केला आहे. ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या योजनेचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा. जिल्हा बँक स्वयंरोजगार योजनेसाठी लवकरच आपले धोरण जाहीर करेल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल येथे आज शासनाच्या या योजनेचा पश्चिम महाराष्ट्रातील शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

उद्योजक कौस्तुभ बुटाला, नगराध्यक्षा माणिक माळी, युवराज पाटील, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, भय्या माने, शशिकांत नाईक, यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थितीत होते. ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत आहे. शासनाच्या विविध विभागांत तीस हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे; पण मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही.

स्वागत प्रास्ताविक भाषणात फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले की लहान व्यावसायिक वाहन खरेदी करून त्या माध्यमातून विविध वस्तू खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी अनुदान आणि अर्थसाहाय्य देणारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल. यावेळी कौस्तुभ बुटाला, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश शेळके यांची भाषणे झाली. आभार शिवाजी पाटील यांनी मानले.

३० कागल योजना प्रारंभ

फोटो कॅपशन.

कागल येथे ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या स्वयंरोजगार योजनेच्या शुभारंभप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवीद मुश्रीफ, भय्या माने, युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.