अन...धनगरवाड्यावरील सईबाईच्या नातवंडाची पायपीट थांबली..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 14:00 IST2020-11-02T13:58:37+5:302020-11-02T14:00:40+5:30
Student, Cycling, EdcationSector, kolhapur अणदूर (ता. गगनबावडा) इथल्या धनगरवाड्यावरील सईबाई बोडेकर या आजीची दोन नातवंडं...मराठी शाळेत शिकायला रोज सात मैलाची डोंगर दऱ्यातून सोडायला आजीची धडपड..पोरं शाळेला गेली की दिवसभर आजी वाटेला डोळ लावून बसतीया..पोरं घरी येवस्थित येतील न्हवं याची आजीला रूकरूक . नातवांनी शिकाव, शानं व्हाव ही आजीची जिद्द कायम.

अणदूर (ता. गगनबावडा) येथील धनरवाड्यावरील भावडांना सचिन व मयुरे शिंदे यांनी सायकली भेट दिल्या. यावेळी रघुनाथ शिंदे, शिवप्रसाद कानवीलकर आदी उपस्थित होते.
हलकर्णी : अणदूर (ता. गगनबावडा) इथल्या धनगरवाड्यावरील सईबाई बोडेकर या आजीची दोन नातवंडं...मराठी शाळेत शिकायला रोज सात मैलाची डोंगर दऱ्यातून सोडायला आजीची धडपड..पोरं शाळेला गेली की दिवसभर आजी वाटेला डोळ लावून बसतीया..पोरं घरी येवस्थित येतील न्हवं याची आजीला रूकरूक . नातवांनी शिकाव, शानं व्हाव ही आजीची जिद्द कायम.
धनगरवाड्यावरील लोकांची जगण्याची आणि मुलांच्या शिक्षणाची वाट स्वातंत्र्यानंतर बिकटच. नातवंडाच्या शिक्षणासाठी आजीची सुरू असलेल्या तळमळीची दखल घेतली ती सह्यगिरी संस्थेने आणि त्याला साथ दिली मयुर आणि सचिन या शिंदे बंधूनी..
शिक्षणासाठी दररोज सात किलोमीटर पायपीट करणाऱ्या भागोजी आणि सखाराम या दोन विद्यार्थ्यांना नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील सचिन शिंदे व मयुर शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ह्यसह्यगिरी शैक्षणिक पालकत्वह्ण या उपक्रमांतर्गत सायकल भेट दिली. सचिन हा कानपूर आयआयटी (उत्तरप्रदेश) येथे प्राध्यापक आहे तर मयुर संकेश्वर (जि. बेळगाव) येथे ड्रायफ्रुटस व मसाले व्यावसायिक आहे.
नातवंडाची शिक्षणासाठीची पायपीट थांबल्यामुळे आजीच्या चेहऱ्यांवील आनंद ओसंडून वाहत होता. आजीचे भावनिक कृतज्ञतेचे आणि आभाराचे चार शब्द ऐकून उपस्थितांची मने हेलावून गेली. यावेळी सरपंच दत्तात्रय गुरव, एम. जी. गुरव, सह्यगिरीचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, संभाजी कांबळे, नामदेव खाडे, विकास कांबळे, राजेश सातपुते यासह ग्रामस्थ व मित्रपरिवार उपस्थित होते. संजय कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. विश्वास भोसले यांनी आभार मानले.